मराठा आरक्षणाचं आंदोलन अराजकीय, राजकीय वळण नको, मराठा क्रांती मोर्चाची ठाम भूमिका

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jun 07, 2021 | 1:50 PM

मराठा आरक्षणाच्या लढ्याला राजकीय वळण देऊ नये. हे अराजकीय व्यासपीठ आहे, ते तसेच ठेवा, अशी भूमिका नाशिकच्या मराठा क्रांती मोर्चानं घेतलीय. Maratha Kranti Morcha Nashik

मराठा आरक्षणाचं आंदोलन अराजकीय, राजकीय वळण नको, मराठा क्रांती मोर्चाची ठाम भूमिका
मराठा आरक्षण आंदोलन, फाईल फोटो

Follow us on

चंदन पुजाधिकारी टीव्ही 9 मराठी, नाशिक: मराठा आरक्षणासंदर्भातील खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा असल्याचं मराठा क्रांती मोर्चाचे करण गायकर यांनी सांगितलं आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील पुढील लढ्यासंदर्भात करण गायकर यांनी त्यांची भूमिका जाहीर केली. करण गायरकर यांनी 16 जूनला वेगवेगळ्या तालुक्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्यात येईल, असं देखील सांगितलं आहे.सकल मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन ठरलेलं आहे. राजकीय नेत्यांनी याला राजकीय वळण देऊ नये. हे अराजकीय व्यासपीठ आहे, ते तसेच ठेवा, असं मराठा क्रांती मोर्चाच्या प्रतिनिधींकडून यावेळी सांगण्यात आलं आहे. (Maratha Kranti Morcha Nashik said Maratha Reservation protest do not politicize by Political leaders)

कोल्हापूरच्या आंदोलनात सहभागी होणार

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी 16 जूनला आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं आहे. या आंदोलनामध्ये कमिटी तयार करून सहभागी होणार असल्याचं गायकर यांनी सांगितलं. मराठा आरक्षण आंदोलनाची जी दिशा ठरेल त्या अनुषंगाने आंदोलन करणार असल्याचही त्यांनी स्पष्ट केलं.

राजकीय वळण देऊ नका

सकल मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन ठरलेलं आहे. राजकीय नेत्यांनी याला राजकीय वळण देऊ नये. हे अराजकीय व्यासपीठ आहे, ते तसेच ठेवा. यापुढे जर संभाजीराजे छत्रपती यांच्यावर वैयक्तिक टीका केली तर समाचार घेण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं नाशिक येथे देण्यात आला. आम्ही कोणाला आंदोलनासाठी कोणाला थांबवलेलं नाही, असंही सांगण्यात आलं.

दरम्यान, नाशिकमध्ये भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मराठा नेत्यांची बैठक सुरु झाली आहे. यामध्ये भाजपचे आमदार आणि नेते बैठकीला उपस्थित आहेत. मराठा आरक्षणाची पुढची दिशा बैठकीत ठरण्याची शक्यता आहे. मात्र, नाशिकमधील मराठा क्रांती मोर्चामध्ये विखे पाटील यांच्या नेतृत्वावरुन दोन गट पाहायला मिळाले आहेत.

हेही वाचा:

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी देशाला संबोधित करणार; कोरोना संकटावर बोलण्याची शक्यता

‘अजितदादा, पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर तुमची काय लायकी राहिली असती?’

(Maratha Kranti Morcha Nashik said Maratha Reservation protest do not politicize by Political leaders)

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI