AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांचे काळजाला भेगा पाडणारे बोल… कंठ दाटला, सर्वांसमोर रडले; समाजबांधव हेलावले

मराठा आरक्षणासाठी अविरत आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटी येथे मनोज जारांगे पाटील यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांचे काळजाला भेगा पाडणारे बोल... कंठ दाटला, सर्वांसमोर रडले; समाजबांधव हेलावले
मनोज जरांगे पाटील
| Updated on: Oct 25, 2024 | 11:43 AM
Share

मराठा आरक्षणासाठी अविरत आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटी येथे मनोज जारांगे पाटील यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या . सुमारे 24 तासांहून अधिक काळ मनोज जरांगे यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेत संवाद साधला. याच दरम्यान जालना जिल्ह्यातील इच्छुकांशी बोलताना मनोज जरांगे हे भावनिक झाल्याचे दिसले. त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले. या जगात कोणी कोणाचं नाही बाबांनो, हा लढा थांबता कामा नये असे सांगताना मनोज जरांगे यांचा कंठ अक्षरश: दाटून आला होता. त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले, हे पाहून सर्वच भावूतक झाले.

विधानसभा निवडणुकीमध्ये चूरस वाढण्याची शक्यता आहे. ही निवडणूक जरी महाविकास आघाडी विरोधात महायुती अशी होणार असली तरी देखील मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील या निवडणुकीमध्ये उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. याच पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीमध्ये जरांगे यांनी इच्छुकांच्या उमेदवारी घेत त्यांच्याशी संवाद साधला.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील ?

हा लढा थांबता कामा नये, अशी साद मनोज जरांगे यांनी घातली. समाज भयाण संकटातून जात आहे. संकट तोडायचं कसं ? मी संकट तोडतोय , मला राजकारण्यांचं बळ नाही. मी गोर- गरबी घेऊन किती दिवस लढू ? त्यांच्या मनगटात ताकदही नाही. ज्याच्या मनगटात दगड उचलायची हिंमत राहिली नाही, त्याचे दोन हात- दोन पाय असूनही मोडून टाकल्यासारखे झाले आहेत. त्याला उभारी नाही द्यायची ? त्याच्या हातात काठी नाही द्यायची ? ते सोडून या वेळेला आपण त्याच्या अंगावर रॉकेल ओतायला लागलोय,असं जरांगे पाटील म्हणाले.

एवढ्या मोठ्या, बलाढ्य समाजाचं दु:ख जाणायचं नाही तर कसं होईल? एवढा मोठा समाज संपला ना बाबांनो तर कोणी नाही आपल्याला . या दुनियेत कोणी कोणाचं नाही. आपला समाज देवापेक्षा मोठा आहे, या समाजाने इतिहास घडवून दाखवला. मला तुमची सत्ता नको, मला तुमचे पैसे नको, बळ आणि आशीर्वाद पाहिजे . समाजाची परिस्थिती लय बिकट आहे मराठा समाजाला संपवायला लागले आहेत असे भावनिक उद्गार मनोज जरांगे यांनी काढले.

कोणी-कोणी घेतली जरांगेची भेट ?

उमरगा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार ज्ञानराज चौगुले मनोज जरांगेच्या भेटीसाठी आले होते. ज्ञानराज चौगुले हे लातूर जिल्ह्यातील उमरगा या राखीव मतदार संघाचे उमेदवार आहेत. शिंदे गटाकडून उमेदवार अर्ज भरून घेतल्यानंतर चौगुले यांनी मध्यरात्री जरांगे पाटील यांची भेट घेतली

धुळे विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील इच्छुकांनी अंतरवाली सराटीत जरांगे पाटलांची भेट घेत मुलाखती दिल्या. शिंदखेडातून ज्ञानेश्वर भामरे धुळ्यातून राजेंद्र काळे तर धुळे ग्रामीण मधून निंबा मराठे उमेदवारी करणार. अंतरवाली सराटी येथे मनोज जारांगे पाटील यांनी घेतलेल्या मुलाखतीदरम्यान धुळे जिल्ह्यातून उमेदवारी मिळावी म्हणून ज्ञानेश्वर भामरे, राजेंद्र काळे ,निम्मा मराठे आधी मराठी बांधव पोहोचले होते यावेळी मनोज जरंगे पाटील यांच्याकडे शिंदखेडा साठी ज्ञानेश्वर भामरे, धुळे शहरातून राजेंद्र काळे, सुनील पाटील तर ग्रामीण म्हणून निंबा मराठे यांनी उमेदवारी मिळावी म्हणून मुलाखत दिली याबाबत तीस तारखेपर्यंत अंतिम निर्णय मनोज जारंगे पाटील देणार असल्याचं सांगण्यात आलं.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी