मोठी बातमी! जरांगे पाटलांना अटक करा, नेमकी कोणी केली ही मागणी? वाचा…

आज निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत मागण्यांबाबत चर्चा केली आहे. मात्र त्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटलांच्या अटकेची मागणी केली आहे.

मोठी बातमी! जरांगे पाटलांना अटक करा, नेमकी कोणी केली ही मागणी? वाचा...
Jarange patil and Sadavarte
| Updated on: Aug 30, 2025 | 5:10 PM

मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरु केलं आहे. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. आज सायंकाळी 6 वाजचा आंदोलनाची परवानगी संपणार आहे. आज निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत मागण्यांबाबत चर्चा केली आहे. यात आंदोलकांवरील केसेस मागे घ्या, मराठा आणि कुणबी एक आहेत हे घोषित करा या मागण्यांचा समावेश होता. या सर्व प्रकरणावर आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

मनोज जरांगे पाटलांना अटक करा – सदावर्ते

गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, कायद्यासमोर जरांगेला मोठं समजू नये. आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जरांगे ऐकला नाही तर चुकीची प्रथा पडेल. नियम मोडले जातील. यामुळे आगामी काळातील आंदोलनांमध्येही नियम मोडण्याची प्रथा पडेल. हे कायद्याचं राज्य आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय म्हणातात यापेक्षा कायदा काय म्हणतो हे पाहून, वरिष्ठ पोलिस निरिक्षण आझाद मैदान यांनी सहा वाजल्यानंतर जरांगेला अटक करून, माननीय मॅजिस्टेट यांच्यासमोर उभे करा. कारण कायद्याची पायमल्ली महाराष्टाला परवडणारी नाहीये.

पुढे बोलताना सदावर्ते म्हणाले की, जरांगे आज न्यायमूर्ती संदीप शिंदेंसमोर म्हणाले की, गॅझेटियर डिक्लेअर करा, कुणबी आणि मराठा एक करा. मात्र न्यायमूर्तींमध्ये हिंमत असायला हवी होती, त्यांनी असं करता येत नाही, सर्वोच्च न्यायालयाचं बंधन आहे असं शिंदे यांनी म्हणालयला हवं होतं. मात्र ते बोलले नाहीत असंही जरांगे पाटलांनी म्हटलं आहे.

गुन्हे मागे घेऊ नका – सदावर्ते

मनोज जरांगे पाटलांनी मराठा आंदोलकांवरील केसेस मागे घेण्याची मागणी केली आहे. यावर बोलताना सदावर्ते म्हणाले की, गुन्हारीच्या केसेस मागे घेण्याची मागणी जरांगेंनी केली आहे. अशा केसेस मागे घेण्यावर सर्वोच्च न्यायलयाने बंधन घातेलेले आहे. पोलिसांच्या वर्दीला हात लावलेला आहे, त्यांच्या डोक्यातून रक्त वाहत आहे. त्यामुळे या केसेस मागे घेऊ नका. असंही सदावर्ते यांनी म्हटलं आहे. त्यामुळे जरांगे पाटील आता गुणरत्न सदावर्तेंना काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.