Marath Reservation | मुख्यमंत्र्याच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगेनी सोडलं उपोषण

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अविरत सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांनी ज्यूस पिऊन उपोषण सोडलं.

Marath Reservation |  मुख्यमंत्र्याच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगेनी सोडलं उपोषण
मनोज जरांगे यांचा लढा यशस्वी झाल्याने मराठा बांधवाचा वाशीमधील शिवाजी चौकात मोठा जल्लोष
Follow us
| Updated on: Jan 27, 2024 | 11:52 AM

नवी मुंबई | 27 जानेवारी 2024 :

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अविरत सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांनी ज्यूस पिऊन उपोषण सोडलं. गेल्या दोन दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू होतं. अखेर वाशी येथील सभेत मुख्यमत्र्यांच्या हस्ते त्यांनी ज्यूस पिऊन उपोषण सोडलं. यावेळी गिरीश महाजन, दीपक केसरकर हेही उपस्थित होते . आज पहाटे सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याचे सांगितल्यानंतर मराठा बांधवांनी एकच जल्लोष केला. त्यानंतर थोडा वेळ आराम केल्यानंतर मनोज जरांगे हे सभास्थळी निघाले. वाटेत हजारो मराठा बांधवाचे अभिनंदन करत, त्यांचे आशिर्वाद घेत मनोज जरांगेंचे पाऊनल पुढे पडत होते.

सभेला सुरूवात करण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवरांनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर सभास्थळी येऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिभन जरांगे पाटलांनी उपोषण सोडले. मुख्यमंत्र्यांनी त्यांना गुलाल लावाल, नवा जीआरही सुपूर्द केला.

प्रदीर्घ लढ्याला यश

मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाचा मनोज जरांगे पाटील यांचा प्रदीर्घ लढा संपला. गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी , मराठा  समाजासाठी सर्वस्व देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या पदरात आरक्षण मिळाल्याने त्यांच्या लढ्याला मोठं यश मिळालं. समाजातील सर्वसामान्य व्यक्ती ते मराठा आरक्षणाचे नेते असा मनोज जरांगे पाटील यांचा प्रवास संघर्षमय होता.

गेल्या आठवड्यात अंतरवाली सराटीमधून त्यांनी पायी यात्रा सुरू करत मुंबईच्या दिशेने कूच केले. त्यांच्यासोबत हजारो मराठा बांधव होते. मजल दरमजल करत ते २६ जानेवारील पहाटे वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये आले. तेथे सरकारच्या शिष्ट मंडळाने त्यांच्याशी चर्चा केली. आणि अखेर मध्यरात्रीच्या सुमारासा त्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या. मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी रात्री दोन वाजता पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सर्व मागण्या मान्य झाल्या असून त्याचे अध्यादेश निघाल्याचे सांगितले. कुणबी प्रमाणपत्राच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाण पत्र द्यावे तसेच त्यांच्या कुटुंबाना सुद्धा प्रमाणपत्र द्यावे ही मागणी मान्य झाली आहे. तसेच सरकारने सगा सोयराबद्दल अध्यादेश काढले आहे. तो मला देण्यात आल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.