मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील असलेल्या लिफ्टचा अपघात, दरवाजा तोडून सर्वांना बाहेर काढलं

बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे, बीडमध्ये मनोज जरांगे पाटील असलेल्या लिफ्टचा अपघात झाला आहे. लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर आदळली आहे.

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील असलेल्या लिफ्टचा अपघात, दरवाजा तोडून सर्वांना बाहेर काढलं
| Updated on: Aug 03, 2025 | 3:44 PM

बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे, बीडमध्ये मनोज जरांगे पाटील असलेल्या लिफ्टचा अपघात झाला आहे. लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर आदळली. सुदैवानं या अपघातामध्ये कोणालाही मोठी दुखापत झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर लिफ्टचा दरवाजा तोडून मनोज जरांगे पाटील यांच्यासह सहकाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं आहे. बीडमधील एका हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे एका रुग्णाला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले होते. बीडमधलं एक मोठं शिवाजीराव क्रिटिकल केअर नावाचां हॉस्पिटल आहे. या रुग्णालयात ही घटना घडली आहे. या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या एका रुग्णाला भेटण्यासाठी मनोज जरांगे पाटील जात होते. मात्र मनोज जरांगे पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसह लिफ्टने पहिल्या मजल्यावर जाताच लिफ्ट अचानक बंद झाली, आणि ती पहिल्या मजल्यावरून थेट ग्राऊंड फ्लोअरला येऊन आदळली. जेव्हा हा अपघात झाला तेव्हा त्या लिफ्टमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यासह त्यांचे काही सहकारी देखील होते, त्या सर्वांना लिफ्टचा दरवाजा तोडून बाहेर काढण्यात आलं.

रुग्णालयात गोंधळ 

मनोज जरांगे पाटील हे रुग्णाला भेटायला जात असताना पहिल्या मजल्यावर ही लिफ्ट अचानक बंद पडली, त्यानंतर ती पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर आदळली. या घटनेमुळे रुग्णालयात एकच गोंधळ उडाला.  या लिफ्टमध्ये अडकलेले मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना लिफ्टचा दरवाजा तोडून बाहेर काढण्यात आलं.  सुदैवानं या अपघातामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही. सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. पुन्हा एकदा मराठा बांधवांचा मोर्चा मुंबईमध्ये धडकणार आहे. या आंदोलनाची तयारी सध्या सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्याकडून बैठकांचा धडाका सुरू आहे. मागील आंदोलनापेक्षा  हे आंदोलन पाच पटीनं मोठं असेल असंही त्यांनी म्हटलं आहे.