AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठी भाषा दिन : मराठीतील हे प्रसिद्ध कवितासंग्रह, तुम्ही कोणते वाचलेत ?

संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात, जगभरातही जिथे जिथे मराठी बांधव आहेत, त्यांच्यासाठी आजचा दिवस हा खास. आज 27 फेब्रुवारी, अर्थात मराठी भाषा गौरव दिन. या दिवसाला विशेष महत्व आहे.

मराठी भाषा दिन : मराठीतील हे प्रसिद्ध कवितासंग्रह, तुम्ही कोणते वाचलेत ?
मराठी राजभाषा दिवसImage Credit source: social
| Updated on: Feb 27, 2025 | 9:25 AM
Share

महाराष्ट्रामध्ये 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. या दिवसाला राज्यभरात विशेष महत्व आहे. आज आम्ही तुम्हाला मराठी भाषा गौरव दिन का साजरा केला जातो? महाराष्ट्रात आणि बाहेरही राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषेचा सार्थ अभिमान आहे. नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जाही देण्यात आला. त्यामुळे तर यंदाचा “मराठी राजभाषा दिन” विशेष आहे. हीच मराठी भाषा जगाच्या कानाकोपऱ्यात पसरावी आणि मराठीचा आदर व्हावा, यासाठी महाराष्ट्रात 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो.

पण आजचाच दिवस मराठी भाषा दिन म्हणून का साजरा केला जातो हे तुम्हाला माहीत आहे का ?

खरंतर , आज ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, प्रसिद्ध कवी, लेखक कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांची आज जयंती असते. त्या निमित्ताने मराष्ट्रामध्ये आणि बाहेरही मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने 21 जानेवारी इ.स. 2013 रोजी घेतला होता. तेव्हापासूनच सर्व मराठी भाषिक आजचा दिवस विशेष उत्साहाने साजरा करतात.

आजच्या या दिवशी मराठीतील खास, प्रसिद्ध , लोकप्रिय, अशा काही कवितासंग्रहांबद्दल जाणून घेऊया. यातील अनेक कवितासंग्रह तुम्हीही वाचले असतील. खाली नमूद केलेल्या कवितासंग्रहांपैकी कोणते तुम्ही वाचलते, हे नक्की सांगा.

मराठीतील प्रसिद्ध कवितासंग्रह…

1) कुसुमाग्रज – ‘विशाखा’, ‘समिधा’, ‘किनारा’

2) नामदेव ढसाळ – ‘गोलपिठा’, ‘तुही यत्ता कंची’, ‘या सत्तेत जीव रमत नाही’, ‘गांडू बगीचा’, ‘मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे’

3) नारायण सुर्वे – ‘माझे विद्यापीठ’, ‘ऐसा गा मी ब्रह्म’, ‘सनद’, ‘जाहीरनामा’

4) ना. धों. महानोर – ‘अजिंठा’, रानातल्या कविता’

5) सुरेश भट – ‘एल्गार’, ‘काफला’, ‘रूपगंधा’, ‘झंझावात’

6) इंदिरा संत – ‘गर्भरेशीम’, ‘बाहुल्या’,

7) शांता ज. शेळके – ‘वर्षा’, ‘रूपसी’, ‘तोच चंद्रमा’,

8) ग्रेस – ‘बाई! जोगिया पुरुष’,‘राजपुत्र आणि डार्लिंग’,‘संध्याकाळच्या कविता’

9) मंगेश पाडगावकर – ‘सलाम’, ‘उदासबोध’

10) बहिणाबाई चौधरी – ‘बहिणाबाईंच्या कविता’

11) आरती प्रभू – ‘नक्षत्रांचे देणे’, ‘दिवेलागण’

12) विठ्ठल वाघ – ‘काया मातीत मातीत’, ‘गावशीव’, ‘पाऊसपाणी’

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा