मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अवघ्या 10 मिनिटांत, कोस्टल रोड वांद्रे सी-लिंकशी कनेक्ट
आज दक्षिण मुंबईत या कोस्टल रोडच्या वांद्रे सी-लिंक झालेल्या जोडपुलाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी करत उद्घाटन केले.
मुंबई कोस्टल रोडला आता वरळी ते वांद्रे सी-लिंकला जोडण्यात आले आहे. मुंबई सागरी किनारी रस्त्यावरुन उत्तरेला जाणारे आता वांद्रे वरळी सागरी सेतूने थेट प्रवास करु शकणार आहे. त्यामुळे नरिमन पॉईंट ते वांद्रे हे अंतर अवघ्या 10 मिनिटात पार करता येणे शक्य होणार आहे. मुंबईच्या कोस्टल रोड ते वरळी – वांद्रे सागरी सेतूशी जोडणाऱ्या पूलाचा टप्पा उद्या शुक्रवार सकाळपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे मुंबईकर वाहन चालकांच्या वेळेत आणि इंधनात मोठी बचत होणार आहे. या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या नव्या टप्प्याचे अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या वाहनाचे सारथ्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. यातून देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय संकेत दिल्याचे म्हटले जात आहे.
मुंबईच्या कोस्टल रोडचा पहिला टप्पा या वर्षी मार्चमध्ये खुला करण्यात आला आहे. कोस्टल रोडच्या उत्तर वाहीनीला पूर्वी सोमवार ते शुक्रवार प्रवासास मुभा होती. आता मात्र गणेशोत्सवात ही मार्गिका शनिवार आणि रविवारी देखील सुरु ठेवण्यात आली आहे. त्यातच कोस्टल रोडवरुन उत्तरेकडे जाणाऱ्यांना आता कोस्टल रोडला थेट वांद्रे ते वरळी सी-लिंकला जोडल्याने दक्षिण मुंबई ते वरळी सी-लिंकपर्यंत सिग्नल मुक्त वेगवान प्रवास होणार आहे. त्यामुळे मुंबईकर वाहनचालकांना आता मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अंतर आता अवघ्या 10 ते 12 मिनिटांत गाठता येणार आहे.
विमानतळावर अर्ध्या तासात पोहचा
कोस्टल रोडचा उत्तर वाहीनीचा मार्ग गर्डरद्वारे वरळी – वांद्रे सागरी सेतूला जोडला गेला आहे. यामुळे या मार्गिकेचा फायदा दक्षिण मुंबईतील रहिवाशांना होणार आहे. मरीन ड्राईव्ह ते वांद्रेपर्यंत सहज 12 मिनिटांत पोहोचता तर येणार आहेच, शिवाय पुढे वांद्रे ते वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मार्गे विमानतळावर अवघ्या 18 मिनिटांत पोहोचता येणार आहे. दक्षिण मुंबईहून विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय टर्मिनलवर अवघ्या 30 मिनिटांत मुंबईकरांना पोहता येणार आहेत.पुर्वी या प्रवासाला दोन तास लागायचे, मात्र आत्ता इंधनाची आणि वेळेची बचत होणार आहे…
देवेंद्र फडणवीस चालक
तीन महिन्यांत वांद्रे ते वरळी येथील गर्डरही सुरू केला जाणार आहे. कोस्टल रोडच्या विस्तार कामामुळे मुंबईकरांचा प्नवास वेगवान होऊन राहणीमान ऊंचावणार आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुलाचे ऊद्घाटन केले. यावेळी सरकारी वाहनाचे सारथ्य देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले म्हणजे जरी मुंख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे विराजमान असले तरी आपल्या हातात या सरकारचे सुकाणू असल्याचा संकेत फडणवीस यांनी दिल्याचे म्हटले जात आहे.