शहीद सुधाकर शिंदे अनंतात विलीन, अशोक चव्हाणांकडून श्रद्धांजली अर्पण

शहीद जवान शिंदे यांना स्थानिक पोलीस आणि इंडो तिबेट दलाच्या वतीने सलामी देत अभिवादन करण्यात आले. दरम्यान, शहीद जवान शिंदे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.

शहीद सुधाकर शिंदे अनंतात विलीन, अशोक चव्हाणांकडून श्रद्धांजली अर्पण
sudharkar shinde
Follow us
| Updated on: Aug 22, 2021 | 12:40 PM

नांदेडः छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या सुधाकर शिंदे यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आलेत. मुखेड तालुक्यातील बामणी ह्या त्यांच्या मूळ गावी शहीद सुधाकर शिंदे यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी राज्य सरकारच्या वतीने मंत्री अशोक चव्हाण यांनी पुष्पचक्र अर्पण केले.

शहीद जवान शिंदे यांना अखेरचा निरोप

शहीद जवान शिंदे यांना स्थानिक पोलीस आणि इंडो तिबेट दलाच्या वतीने सलामी देत अभिवादन करण्यात आले. दरम्यान, शहीद जवान शिंदे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. फुलांचा वर्षाव करत यावेळी शहीद शिंदे यांना गावकऱ्यानी निरोप दिलाय. या प्रसंगी जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी तथा मान्यवरांनी शहीद जवानांच्या पार्थिवाचे दर्शन घेतलं.

नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहणार

यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी शहीद जवान सुधाकर शिंदे यांच्या बलिदानाबद्दल दुःख व्यक्त केलंय. तसेच नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहणार असल्याचे ते म्हणालेत. दरम्यान, या भागातील सर्वच व्यापाऱ्यांनी आज बंद पाळत शहीद जवानाला श्रद्धांजली वाहिलीय.

मुखेड तालुका आणि नांदेड जिल्ह्यावर शोककळा

माओवाद्यांनी छत्तीसगडमधील नारायणपूर येथे केलेल्या भ्याड हल्ल्यात नांदेड जिल्ह्यातील बामणीचे सुपुत्र असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदे शहीद झाले. यामुळे त्यांचे जन्मगाव बामणी, मुखेड तालुका आणि नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली. या शहीद जवानाचा अंत्यविधी आज सकाळी शासकीय इतमामात बामणी येथे करण्यात आला. या अंत्यविधीसाठी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण हे उपस्थित राहून राज्य शासनाच्या वतीने आदरांजली वाहिली.

संबंधित बातम्या

सणासुदीमुळे नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये गर्दी वाढली; कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण मिळण्याची भीती!

पनवेल महानगर पालिकेची ऑनलाईन सभा उशिराने सुरु, शेकापचे नगरसेवक अरविंद म्हात्रे आक्रमक

Martyr Sudhakar Shinde merged with Infinity, Tribute from Ashok Chavan

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.