पनवेल महानगर पालिकेची ऑनलाईन सभा उशिराने सुरु, शेकापचे नगरसेवक अरविंद म्हात्रे आक्रमक

महापौर, उपमहापौर पनवेल मनपा अधिकारी येऊन 11 वाजून 50 मिनिटे झाली, मात्र व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये तांत्रिक अडचण असल्याने आवाज इतरांपर्यंत पोहचत नव्हता. महापौरांनी 4 वेळा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहचत आहे का ? अशी विचारणा केली, मात्र ऑनलाईन महसभेचा पुरता घोळ बघायला मिळाला.

पनवेल महानगर पालिकेची ऑनलाईन सभा उशिराने सुरु, शेकापचे नगरसेवक अरविंद म्हात्रे आक्रमक
पनवेल महानगर पालिकेची ऑनलाईन सभा उशिराने सुरु, शेकापचे नगरसेवक अरविंद म्हात्रे आक्रमक
Follow us
| Updated on: Aug 20, 2021 | 9:55 PM

पनवेल : पनवेल महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज(20 ऑगस्ट) रोजी महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. यावेळी उपमहापौर जगदीश गायकवाड, आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, नगरसचिव धैर्यशील जाधव पालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे महासभा 20 मिनिटे उशिरा सुरु झाली. (Online meeting of Panvel Municipal Corporation 20 minutes late, corporator Arvind Mhatre aggressive)

शेकापचे नगरसेवक अरविंद म्हात्रे आक्रमक

महापौर, उपमहापौर पनवेल मनपा अधिकारी येऊन 11 वाजून 50 मिनिटे झाली, मात्र व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये तांत्रिक अडचण असल्याने आवाज इतरांपर्यंत पोहचत नव्हता. महापौरांनी 4 वेळा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहचत आहे का ? अशी विचारणा केली, मात्र ऑनलाईन महसभेचा पुरता घोळ बघायला मिळाला. ऑनलाईन महासभेत घरातल्या मंडळींचा आवाज ऐकू येत होता. अखेर महापौरांना संबंधित नगरसेविकेला सांगावे लागेल तेव्हा आवाज म्युट करण्यात आला. त्यात वेळ जात असल्याने शेकापचे नगरसेवक अरविंद म्हात्रे चांगलेच आक्रमक झाले. पनवेल मनपाला वेळेचे महत्व नाही का ? असं म्हणत त्यांनी आपला प्रश्न सुरूच ठेवला. त्यात शेकापचे विरोधीपक्ष नेते प्रीतम म्हात्रे आणि नगरसेवक गणेश कडू यांनी ऑफलाईन पद्धतीने महासभा घेण्यात यावी यासाठी जोर धरला. आता इतर सर्व आस्थापना सुरू होत असताना महासभा ऑफलाईन का घेतली जात नाही असा प्रश्न केला. त्यावर उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी राज्य शासनाकडून आपण परवानगी आणा मग ऑफलाईन महासभा घेऊ असा टोला लगावला.

अरविंद म्हात्रे, कविता चौतमोल यांची प्रतिक्रिया

उशिरा महासभा सुरू करून मनपा महासभा किती तत्पर आहे हे दिसून येते. त्यात वेळ, मोबाईलची चार्जिंग, इंटरनेट वाया जाते, अशी प्रतिक्रिया अरविंद म्हात्रे यांनी दिली. तर कधीतरी तांत्रिक अडचण होते. त्यामुळे 15 ते 20 मिनिट उशिरा सुरू झाली. आजपर्यंत महासभा वेळेवर सुरू झाली आहे. तसेच पुढल्या वेळी महासभा ऑफलाईन होण्यासाठी प्रयत्न करू, असे महापौर कविता चौतमोल म्हणाल्या.

महासभेत विविध विषयांना मंजुरी

महापालिकेच्या वतीने कळंबोली येथे भारतीय कापूस निगमच्या गोदामांमध्ये सुसज्ज असे कोविड सेंटर उभारण्यात येत आहे. या सेंटरकरीता रायगड सुरक्षा रक्षक मंडळ यांचे सुरक्षा रक्षक घेणे तसेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्याकडून सुरक्षा रक्षक घेणे असे सुरक्षा रक्षक घेण्यास महासभेने मंजुरी दिली आहे. पनेवल शहरातील चार धोकादायक शौचालये निष्कासित करण्यास महासभेने मंजुरी दिली. यामध्ये एमएसईडीसीएल कार्यालय लगतचे शौचालय, हुतात्मा स्मारकासमोरील शौचालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग येथील रेज बाजारमधील शौचालय तसेच लाईन आळी येथील सुतार पेंटर घराजवळील शौचालय यांचा यामध्ये समावेश आहे.

प्रश्नोत्तरांच्या तासाला विविध विषयांवर चर्चा

यावेळी मुख्य लेखापरिक्षक विठ्ठल सुडे आणि सहाय्यक आयुक्त तथा लेखाधिकारी चंद्रशेखर खामकर यांची प्रशासकीय कारणास्तव बदली झाल्याने त्यांचा निरोप समारंभ करण्यात आला. या वेळी विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. या सभेला आयुक्त गणेश देशमुख, उपमहापौर जगदिश गायकवाड आदी उपस्थित होते. (Online meeting of Panvel Municipal Corporation 20 minutes late, corporator Arvind Mhatre aggressive)

इतर बातम्या

Breaking : पाकिस्तानच्या ग्वादर शहरात मोठा बॉम्ब स्फोट, चीनच्या 8 इंजिनिअर्सचा मृत्यू, तालिबान्यांवर संशय

गोपीचंद पडळकर यांनी करुन दाखवलं, आता सरकार अ‌ॅक्शन मोडमध्ये, बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्यामुळे गुन्हा दाखल

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.