नवी मुंबई : शहरात कोरोनाची दुसरी लाट ओसरली तरी अनेक दिवसांपासून रुग्णसंख्या एकाच आकड्याच्या भोवती फिरत आहे. प्रशासनाने सर्व बाजारपेठा खुल्या केल्या आहेत. दुकाने उघडी ठेवण्याच्या वेळेत वाढ केली आहे. त्यामुळे मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये सणांच्या खरेदीला गर्दी होऊ लागली आहे. शिवाय प्रशासनाचे लसीकरण अगदी सुमार चालू आहे. त्यामुळे हि गर्दी तिसऱ्या लाटेला निमंत्रण असून तिसऱ्या लाटेला तडाखा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहरात डेल्टा प्लस रुग्ण आढळून आल्याने तिसऱ्या लाटेचा सुरुवात झाल्याचे दिसत आहे. शिवाय सध्या तिसऱ्या लाटेतील डेल्टा प्लस व्हेरिएन्टचा धोका लहान मुलांना अधिक असल्याने सुरुवातीलाच काळजी घेणे आवश्यक असणार आहे. आतापासूनच कोरोना नियम पाळणे आवश्यक असल्याचे मत तज्ञ व्यक्त करत आहेत. (Crowd of citizens in Navi Mumbai APMC Market)