AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवी मुंबई एपीएमसी मार्केटमधील शौचालये अखेर 7 दिवासानंतर खुली

एपीएमसी सभापती अशोक डक यांनी APMC मार्केटमधील शौचालये सात दिवसांनंतर खुली करण्याचे आदेश दिले आहेत. ही शौचालये मोफत सेवा या धर्तीवर सुरु केली आहेत. त्याचा कारभार एपीएमसीचा स्वच्छता विभाग पहात आहे.

नवी मुंबई एपीएमसी मार्केटमधील शौचालये अखेर 7 दिवासानंतर खुली
नवी मुंबई एपीएमसी मार्केटमधील शौचालये खुली
| Edited By: | Updated on: Jul 26, 2021 | 4:35 PM
Share

नवी मुंबई : मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये कंत्राटदाराने पैसे थकवल्याने फळ आणि भाजीपाला मार्केटमधील १० शौचालये सील करण्यात आली होती. याची बातमी दोन दिवसांपूर्वी TV9 ने दाखवल्याने याचे गांभीर्य लक्षात घेऊन एपीएमसी सभापती अशोक डक यांनी APMC मार्केटमधील शौचालये सात दिवसांनंतर खुली करण्याचे आदेश दिले आहेत. ही शौचालये मोफत सेवा या धर्तीवर सुरु केली आहेत. त्याचा कारभार एपीएमसीचा स्वच्छता विभाग पहात आहे. दरम्यान शौचालये खुली झाल्यामुळे दुसरीकडे शेतकरी आणि ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आशिया खंडातील सर्वात मोठ्या बाजारपेठेत नैसर्गिक विधीची सुविधाच बंद करण्यात आल्याने Tv9 मराठीने ही बातमी दाखवली होती. तर या ठिकाणी उघड्यावर होत असलेल्या नैसर्गिक विधीचाही उल्लेख करत बाजार परिसरात वाढलेलं घाणीचं साम्राज्य निदर्शनास आणलं होतं. (Toilets in Navi Mumbai APMC Market open after 7 days)

शौचालय सील करण्याची कारवाई

2017-18 साली संबंधित कंत्राटदाराला बाजार समितीने निविदा पद्धतीने तीन संस्थांच्या नावे फळ आणि भाजीपाला मार्केट मधील 10 शौचालये चालविण्यास दिले होते. मात्र, गेली अडीच वर्ष होऊन सुद्धा कंत्राटदाराने बाजार समितीला पुरेसे पैसे न भरल्याने बाजार समितीने शौचालय सील करण्याची कारवाई केली आहे. कंत्राटदाराने तीन महिन्यात अशी काही थकबाकी ठेवल्यास बाजार समिती त्याच्या अनामत रकमेतून ती रक्कम वसूल करून शौचालये ताब्यात घेऊ शकते. परंतू असं केलं गेलं नसल्यानं जवळपास ७ कोटी रुपये या कंत्राटदारांकडे थकबाकी राहिल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे प्रशासनाने तीन महिन्याचा नियम मोडून अडीच वर्ष कंत्रादाराला दिल्याने बाजार समितीचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे.

कंत्राटदाराची चौकशी करण्याची मागणी

याबाबत बाजार समितीने कंत्राटदारास नोटीस दिली होती. मात्र, कारवाई टाळण्यासाठी कंत्रादाराने पणन संचालकांकडे दाद मागितल्याने संचालकांनी यावर 7-8 महिन्यांपूर्वी कारवाईला स्थगिती दिली होती. यावर संचालक मंडळाची नेमणूक झाल्यावर मागणी करून मंडळाने याबाबत पणन संचालकांकडून स्थगिती उठवली होती. तरी पैसे भरण्याऐवजी कंत्राटदाराने न्यायलायत धाव घेतली. न्यायालयाने 25 टक्के रक्कम कंत्राटदाराकडून भरून घेऊन कंत्राट सुरु ठेवण्याचे आदेश बाजार समितीला दिले. मात्र, तरीसुद्धा कंत्रादाराने हे पैसे न भरल्याने बाजार समितीने हि कारवाई केली. या सगळ्या प्रकारात एवढे दिवस कंत्राटदाराला पाठीशी घालणारा बाजार समिती अधिकारी कोण? असा सवाल केला जात आहे. त्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने एवढे वर्ष कंत्राटदार शौचालये चालवत होता. तर बाजार समितीकडे पैसे नसताना ७ कोटी रुपये नुकसान झाल्याने कंत्राटदाराची चौकशी करून संबंधित अधिकारी शोधून काढावा, अशी मागणी बाजार घटक करत आहे. शिवाय अधिकाऱ्याची चौकशी करून बडतर्फ करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

इतर बातम्या :

…तर 1 ऑक्टोबरपासून आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू, शशिकांत शिंदेंचा इशारा

नवी मुंबईत राष्ट्रवादीकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात, 80 हजार किलो खाद्य सामग्री रवाना

Toilets in Navi Mumbai APMC Market open after 7 days

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.