
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी काल बीडमध्ये मूक मोर्चा निघाला. यात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. तर दुसरीकडे आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीच नाव घेतले होते. यानंतर प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांनी आपली माफी मागावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर आज प्राजक्ता माळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. तसेच रुपाली ठोंबरे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात सध्या ट्विटरवॉर सुरु आहे. यासोबतच आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिल्या व्यावसायिक विमानाचे यशस्वी लँडिंग करण्यात येणार आहे. यामुळे सर्वांचेच लक्ष त्याकडे लागलं आहे.
छोट्या पडद्यावरील ‘मुलगी झाली हो’ या सिरीयल तसेच अनेक मराठी चित्रपटात काम केलेले अभिनेते किरण माने हे शूटिंग निमित्त नाशिकच्या देवळाली कॅम्प येथे कुटुंब सोबत आले होते. या प्रसंगी येवला शहरात येऊन पैठणी खरेदीचा मोह माने कुटुंबाला आवरता आला नाही.
तुळजापूरमधील तुळजाभवानी मंदिरात गेल्या आठ दिवसांपासून भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून भावीक देवीच्या दर्शनासाठी तुळजापूर मध्ये गर्दी करत आहेत.
गोरेगाव पूर्व आरे येथील जंगलाला आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग जंगलात पसरण्यापासून रोखण्यात आली आहे.
नांदेड हिंगोली महामार्गावर एसटी बस कंटेनरला जाऊन धडकली. या अपघातात एसटीचा बस चालक गंभीर जखमी झाला. बसमधील 20 प्रवासी सुखरूप आहेत.
भाजपचे माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सप्तश्रृंगी देवीचं दर्शन घेतलं. रविंद्र चव्हाण यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
मंत्रिमंडळात स्थान न देता प्रदेश प्रभारीपदाची जबाबदारी चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे. नवा राजकीय प्रवास सुरु करण्याआधी त्यांनी सप्तश्रृंगी देवीचं दर्शन आणि आशीर्वाद घेतला.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिली उड्डाण प्रमाणीकरण चाचणी यशस्वीरित्या पार पडली. इंडिगो एअरलाइन्सच्या A320 विमानाला वॉटर कॅनन सलामी देण्यात आली.
बीड: CID चे पोलीस अधीक्षक सचिन पाटील बीडमध्ये दाखल झाले. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या संपर्कात असलेल्या लोकांची चौकशी सुरू आहे. अधिकृत माहिती देण्यास CID अधिकाऱ्यांनी नकार दिला असून आतापर्यंत शंभरहून जास्त लोकांची चौकशी करण्यात आली.
ठाणे नगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष ते ठाणे महानगरपालिकेचे प्रथम महापौर तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे शिवसेना नेते, खासदार सतीश प्रधान यांचे रविवारी दुपारी २ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. सतीश प्रधान यांनी ठाणे शहराच्या विकासामध्ये तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक मजबुतीसाठी मोठे योगदान दिले.
बीड: राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवती प्रदेशाध्यक्षांची चौकशी सुरू आहे. संध्या सोनावणे यांची चौकशी सुरू आहे. बीड शहर पोलिस ठाण्यात CID कडून चौकशी सुरु आहे. सोनावणे यांच्यासह अन्य तीन जणांची चौकशी सुरू आहे.
परभणीत सकल मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बैठकीत परभणीत मोर्चा काढण्यातसंदर्भात चर्चा सुरू आहे. मोठ्या संख्येने सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी बैठकीत उपस्थित आहेत. 3 जानेवारी रोजी परभणीत मूक मोर्चाचं आयोजन करण्यात येणार आहे. शनिवार बाजार इथून सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे.
अवकाळी पावसामुळे शिरपूर तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. पपई, केळी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे तालुक्यातील 1528 शेतकऱ्यांचे 1241 सेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान पाहायला मिळत आहे. आमदार काशीराम पावरा यांनी नुकसानीची पाहणी केली आहे. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा येथील सरपंच नामदेव निकम यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तपास करून संरक्षण द्या, या मागणीसाठी आज मेसाई जवळगा येथे गावकऱ्यासह सरपंचाचे आंदोलन सुरु आहे. सरपंचासह गावकरी सकाळपासून पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करत आहेत.
इगतपुरी : मुंबई नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटातील जव्हार फाट्याजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. गेल्या दोन तासांपासून वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत, जुन्या कसारा घाटात रस्त्याचे काम सुरू असून एक अवजड वाहन रस्त्यामध्येच बंद पडल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. आज रविवार असल्याने सुट्टीच्या दिवस असल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.
आमचं कलाक्षेत्र बदनाम नाही, परंतू अशा माणसांमुळे कलाक्षेत्र बदनाम होत आहे असा आरोप अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी केला आहे.
वैयक्तिक राजकारणासाठी अशा प्रकारे कलाकारांची बदनामी करणे योग्य नाही.महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधींना हे शोभणारे नाही. सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी केली आहे.
वैयक्तिक राजकारणासाठी महिला कलाकारांचा वापर करणे बंद करावे असाही टोला अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी लगावला आहे.
सुरेश धस लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना राजकारण करायचे आहे तर करावे परंतू एका महिला कलाकारांना का ओढवे असा सवाल अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी केला आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले 30 तारखेला सकाळी 10 वा. मस्साजोग येथील संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेणार आहेत,त्यानंतर ते परभणीला जाऊन पीडीत सोमनाथ सुर्यवंशी कुटुंबाची घेणार भेट आहेत.
संतोष देशमुख प्रकरणाचा मोहरक्या खंडणीत दोषी आहे. हे कोण बोलले, मुख्यमंत्री त्यांच्या भााषणात बोलतात. मग त्या मोहरक्याला अटक का झाली नाही. हा प्रश्न आहे, असे छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले.
छत्रपती संभाजीराजे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदावरुन काढण्याची मागणी केली. त्यांना पालकमंत्री केले तर मी बीडचे पालकत्व घेणार असल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले.
पुढच्या काळात सावध राहा. आरोपी सापडणे काही मोठी गोष्ट नाही. संतोष भैय्या यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आपण मागे हटायचे नाही. आपल्या लेकारला न्याय मिळाला पाहिजे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
तुम्ही नाव घेत नाही. मी लढत नाही. तुम्हाला काय माहीत आहे का मी लढत नाही. मीच एकट्याने का करावे. सुरेश धस अण्णाच एकटे काफी आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
मी काय करतो, यापेक्षा समाजाने काय ठरवले, हे महत्वाचे आहे. तेच मी करणार नाही. माझ्या जातीवर कोणी अन्याय केला तर मी त्याला सोडत नाही, मग तो कोणीही असो, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
लोकसभेत ७५ हजार मते बोगस केले. त्यानंतर मनोज पाटील यांच्या आशीर्वादामुळे मी विजयी झालो, असे खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटले आहे.
आपण सर्व जण लढत आहोत. परंतु फक्त आश्वासन मिळाले आहे. चौथा व्यक्ती अटक झाला की त्याने आत्मसमर्पण केले आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यास फाशी होणारच, असे खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटले.
माझ्या बहिणीचे कुंकू पुसले गेले आहे. आता मी शांत बसणार नाही. माझा बाप २२ वर्ष रेल्वे स्टेशनवर झोपलाय. मी हमालाचा नातू आहे. मला गरीबी शिकवू नका. आम्ही लढून पुढे आलोय. अजून लढतो, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.
संतोष देशमुख कोणत्याही जातीचा नाही. बीड हा पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी सोशालिस्ट निवडून आले होते. समाजवादी विचाराचे बबनराव ढाकणे विजयी झाले. वेगवेगळ्या जातीच्या लोकांनी या ठिकाणचं नेतृत्व केलं. या ठिकाणी जातीचा प्रश्नच आला नाहीमहाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण कुठंपर्यंत कुठपर्यंत गेलं हे पाहून आश्चर्य वाटतं. याला तुम्ही वाल्मिकी कशाला म्हणता. तो वाल्या आहे. त्रेता युगात वाल्याचा वाल्मिकी झाला. आता वाल्मिकीचा वाल्या झाला. कसला वाल्मिकी कराड. तो वाल्या आहे.
पंकजाताई तुम्ही संतोष देशमुखच्या घरी का गेले नाहीत? पंकजाताई तुम्हाला चांगली माणसं जमत नाही. आम्ही जी हुजूर करणार नाही. तुम्हाला तुमचा याचं उत्तर द्यावं लागेल, आमदार सुरेश धस यांचा घणाघाती टीका केली आहे.
माझ्या वडिलांचा जन्म इथेच आनंद हॉस्पिटलमध्ये झाला होता. माझ्या पणजीने त्यांचं नाव संतोषी मातेवरून संतोष ठेवलं होतं. मी विनंती करते माझ्या वडिलांना न्याय मिळालाच पाहिजे. त्यांची हत्या कशी झाली तुम्हाला माहीत आहे. ते समाज सेवक होते. शेवटपर्यंत ते समाज सेवा करत होते. दलित समाजातील व्यक्तीची मदत करताना त्यांची हत्या झाली.. आरोपींना शिक्षा होईपर्यंत लढा देणार आहे. तुम्ही आज माझ्या कुटुंबासोबत मोठ्या संख्येने उपस्थित आहात. तसेच माझ्यासोबत राहा, अशी भावना वैभवी देशमुख यांनी केली.
वाल्मिक कराडला पालकमंत्रिपद भाड्याने दिल्याचा आरोप प्रकाश सोळंके यांनी केला. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. पण त्याला अजूनही अटक झाली नाही, असा आरोप प्रकाश सोळंके यांनी केली आहे. वाल्मिक कराडच्या मागे धनंजय मुंडेंचा हात आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंचं मंत्रिपद काढून घ्यावं.
वाल्मिक कराडला अटक झाली पाहीजे. पण वाल्मिक कराडला मंत्री धनंजय मुंडे यांचं संरक्षण आहे. तसेच धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली.
वाल्मिकी कराडला अटक करा अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी ही मागणी केली आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे, असंही त्यांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार मध्ये अनेक मंत्री डागी आहेत. हे सरकार डागी आहेत, असं म्हणणं वावग ठरणार नाही. सर्व ठिकाणी गुंडा राज, जंगल राज सुरू आहे. बीड प्रकरण सत्ता पक्ष आरोप करत आहे. महाराष्ट्र भयभीत आहे. राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही घटना का लपवत आहे, महिला सुरक्षित नाही, राज्य सुरक्षित नाही, असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला
बीडमध्ये सर्व संघटना आणि सर्वपक्षीय नेते रस्त्यावर उतरले आहे. बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चा हजारो लोक सहभागी झाले आहे.
बीडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून मूक मोर्चा काढण्यात आला. हजारोंच्या संख्येने मोर्चात नागरिकांची उपस्थिती होती. आरोपीला फाशी झाली पाहिजे अशा आशयाची घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.
छत्रपती संभाजी महाराज, मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.
जालन्याच्या भोकरदन मधील अन्वा येथून स्टोन क्रेशर वर कामाला असणाऱ्या तीन बांगलादेशी तरुणांना दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतलंय.हुमायून कबीर अली अहमद, माणिक खान जन्नोदिन खान, इमदाद हुसेन मोहम्मद अली हुसेन अशी या तीन तरुणांची नावे आहेत. नाशिक आणि छत्रपती संभाजी नगरच्या दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई करून या तरुणांना ताब्यात घेतलाय. हे तिघेही तरुण अवैधपणे कागदपत्राशिवाय राहत असून घुसखोरी करून भारतात आले असल्याच तपासात उघड झालं आहे.
दोन मुलींवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी राजगुरुनगर शहरातून निघालेला मोर्चा खेड तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चातील नागरिकांनी आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. यानंतर तहसीलदार याना निवेदन देण्यात आले.
बुधवार दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी शौर्यदिन निमित्त विजयस्तंभावर मानवंदना अभिवादन पारंपरिक कार्यक्रामांचे कोरेगाव भिमा विजयरणस्तंभ सेवा समिती अध्यक्ष सर्जेराव वाघमारे रिपब्लिकन विद्यार्थी सेना प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे रिपब्लिकन कामगार सेना महाराष्ट्र प्रमुख युवराज बनसोडे यांच्यावतीने नियोजन केले जाणार आहे
ठिय्या आंदोलनासाठी अंजली दमानिया यांना जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकरी कार्यालय परिसरात आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आली आहे.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप देण्यात येत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतर अनेक नेते उपस्थित आहेत.
दिल्लीच्या निगम बोध घाट येथे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप देण्यात येत आहे. भाजपकडून अमित शाह, राजनाथ सिंह अंत्यविधीला उपस्थित आहेत. तिन्ही दलांकडून मनमोहन सिंग यांना सलामी देण्यात आली.
दोन मुलींवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी पुणे राजगुरुनगर शहरातून निघालेला मोर्चा खेड तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चात सहभागी झालेल्या महिला, पुरुष मनोगत व्यक्त करत आहेत. यानंतर तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार.
“वाल्मिक कराड बिनधास्त फिरतोय. त्याचे आश्रयदाते यांचा राजीनामा का घेत नाही? मंत्रिपदाची शपथ घेण्याआधी सांगितलं होतं, यांना मंत्रिपद देऊ नका. यांना मंत्रिपद दिलं, तर न्याय देण्यात गडबड होऊ शकते” अशा शब्दात संभाजी राजे यांनी संताप व्यक्त केला. त्यांचा रोख धनंजय मुंडेंकडे होता.
सरपंच संतोष देशमुख प्रकरणात आज बीडमध्ये मूक मोर्चा. सकाळपासूनच सर्व बाजारपेठा बंद. शाळा, महाविद्यालये देखील बंद. अत्यावश्यक सेवा वगळता बीड कडकडीत बंद राहणार. शहरात येणारी सर्व वाहतुक वळवली. मूक मोर्चासाठी 400 पोलीस कर्मचारी तैनात. 4 dysp, एक अपर पोलीस अधीक्षक देखरेखीला. राज्य सुरक्षा बलाच्या ही दोन तुकड्या. आरसीपीच्या 6 प्लाटून तैनात.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड शहरात मूक मोर्चा. मोर्चात सहभागी होण्यासाठी अनेक महिला दाखल. हातात न्यायाचे फलक घेऊन महिला दाखल. डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात गर्दी व्हायला सुरुवात.
“काल रात्री मला फोन आला. कॉल करणाऱ्यांनी मला व्हॉइस मेसेज टाकले. त्या व्यक्तीने सांगितले ते तीन फरार आरोपी मिळणार नाहीत. त्यांचा मर्डर झाला आहे. या संदर्भात ही माहिती बीड पोलीस अधीक्षक यांना दिली आहे. सात पैकी तिघांची हत्या झाल्याचं कॉल करणाऱ्यांनी सांगितले. हे खरे आहे की खोटे आहे, मला काही माहीत नाही” असं अंजली दमानिया यांनी सांगितलं.
मराठी चित्रपट अभिनेत्री प्राजक्ता माळी आज पत्रकार परिषद घेणार आहे. आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्याला प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेद्वारे उत्तर देणार आहेत. माझी भूमिका मी पत्रकार परिषदेद्वारे माध्यमांसमोर मांडणार असल्याचे प्राजक्ता माळी यांनी सांगितले. मात्र, पत्रकार परिषदेची वेळ आणि ठिकाण अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही.
“अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी अद्याप महिला आयोगाकडे तक्रार केलेली नाही. प्राजक्ता माळी यांनी अद्याप आमच्याशी कुठलाही संपर्क साधलेला नाही. प्राजक्ता माळी यांनी जर आमच्याकडे तक्रार केली तर त्याची दखल घेतली जाणार. बीडच्या घटनेची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सखोल चौकशी करणार” असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.
“आलेले सर्व लोक मला न्याय देण्यासाठी येत आहेत. आम्हाला मदत करण्याची लोकांची प्रामाणिक भावना आहे. कोणी राजकारण करत असेल, तर ते त्यांच्या ठिकाणी असु दे मला काही हरकत नाही. पण मला मदत करताना कोणीही राजकारण करत नाहीत असे मला वाटते. राजकीय नेत्यांनी कुठेही भांडवल केले नाही” असं संतोष देखमुख यांचे बंधु धनंजय देशमुख म्हणाले.