मध्य आणि पश्चिम रेल्वेचा रविवारी ब्लॉकवार, पाहा कुठे-कुठे ब्लॉक
रेल्वे मार्गाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी दर रविवारी मेगा ब्लॉक घेतला जातो. या काळात लोकल गाड्यांना गर्दी होत असल्याने प्रवाशानी नियोजन करुनच प्रवास करावा लागत असतो.

मुंबईकरांसाठी नेमचि येतो पावसाळा त्याप्रमाणे रविवारच्या ब्लॉकचे टेन्शन असते. मध्य रेल्वेने रविवार दि. ०८ जून २०२५ रोजी मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मुंबई डिव्हीजनमधील उपनगरीय मार्गांवर हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेच्या मीरारोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान मेट्रो मार्ग-९ च्या गर्डर लॉन्चिंगमुळे शनिवारी, रविवार आणि सोमवारी मध्यरात्री मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी रात्री चर्चगेटवरुन विरारला जाणारी शेवटची लोकल रात्री ११.५८ तर भाईंदरला जाणारी शेवटची लोकल ११.३८ वाजता सुटणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी नियोजन करुनच प्रवास करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
मुख्य मार्गावरील ब्लॉक विभाग:
विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान सकाळी ८.०० ते दुपारी १.३० पर्यंत ५ व्या आणि ६ व्या मार्गावर
अप मेल-एक्सप्रेस गाड्यांचे डायव्हर्जन
पुढील अप मेल/एक्सप्रेस गाड्या ठाणे येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.
लोकमान्य टिळक टर्मिनस येथे जाणाऱ्या गाड्या विद्याविहार स्थानकावर सहाव्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील.
* गाडी क्र. 11010 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्सप्रेस
* गाडी क्रमांक 12124 पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन
* गाडी क्रमांक 13201 पाटणा- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
* गाडी क्रमांक 17221 काकीनाडा- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
* गाडी क्रमांक 12126 पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्सप्रेस
* गाडी क्रमांक 12140 नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
* गाडी क्रमांक 22226 सोलापूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस
* गाडी क्रमांक 12168 बनारस- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
* गाडी क्रमांक 12321 हावडा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
* गाडी क्रमांक 12812 हटिया -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
* गाडी क्रमांक 11012 सोलापूर -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस
डाऊन मेल/एक्सप्रेस गाड्यांचे डायव्हर्जन
* पुढील डाउन मेल/एक्सप्रेस गाड्या विद्याविहार स्टेशनवर डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील आणि पाचव्या मार्गावर ठाणे येथे पुन्हा वळवल्या जातील.
* गाडी क्रमांक 11055 लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपुर एक्सप्रेस
* गाडी क्रमांक 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस- जयनगर एक्सप्रेस
* गाडी क्रमांक 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस -तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस
* गाडी क्रमांक 17222 लोकमान्य टिळक टर्मिनस- काकीनाडा एक्सप्रेस
हार्बर लाईनवर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत
पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान (पोर्ट लाईन वगळून) अप आणि डाऊन हार्बर लाईनवर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत मेगाब्लॉक आहे.
हार्बर लाईन ब्लॉक विभाग
पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाऱ्या अप हार्बर लाईनवरील फेऱ्या सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ पर्यंत आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पनवेल/बेलापूर येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर लाईनवरील फेऱ्या सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ पर्यंत रद्द राहतील.
ट्रान्स हार्बर लाईन ब्लॉक विभाग
पनवेल येथून ठाणे येथे जाणारी अप ट्रान्स- हार्बर लाईन सेवा ११.०२ ते १५.५३ पर्यंत आणि ठाणे येथून पनवेल येथे जाणारी डाउन ट्रान्स-हार्बर लाईन सेवा १०.०१ ते १५.२० पर्यंत रद्द राहतील.
ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी विभागात विशेष लोकल चालतील.
ब्लॉक काळात ठाणे- वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्स- हार्बर लाईन फेऱ्या उपलब्ध असतील.
ब्लॉक काळात बेलापूर/नेरूळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन फेऱ्या उपलब्ध असतील.
पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांनो शेवटच्या लोकलचे वेळापत्रक पाहा
मेट्रो लाईन 9 चे गर्डर लॉन्च करण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या मीरा रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान सर्व मार्गांवर मेजर नाईट ब्लॉक घेतला जाणार आहे. 07/08 जून, 2025 (शनिवार/रविवार) च्या मध्यरात्री 01:30 ते 3:15 वाजेपर्यंत 1.45 तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्याच प्रकारे 08/09 जून, 2025 (रविवार/सोमवार) आणि 09/10 जून, 2025 (सोमवार/मंगळवार) च्या मध्यरात्री 01:45 ते 3:00 वाजेपर्यंत 1.15 तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे.
07/08 जून, 2025 (शनिवार/रविवार) वेळापत्रक
• चर्चगेट ते विरार – शेवटची लोकल ट्रेन रात्री 11:58 वा.
• चर्चगेट ते भाईंदर शेवटची लोकल ट्रेन रात्री 11:38 वा.
• विरार ते चर्चगेट शेवटची लोकल ट्रेन रात्री 12:05 वा.
08/09 जून, 2025 (रविवार/सोमवार) रोजी लोकलचे वेळापत्रक
• चर्चगेट ते विरार शेवटची लोकल ट्रेन रात्री 12:20 वा.
• विरार ते चर्चगेट शेवटची लोकल ट्रेन रात्री 12:05 वा.
09/10 जून, 2025 (सोमवार/मंगळवार) रोजी लोकलचे वेळापत्रक
• चर्चगेट ते विरार शेवटची लोकल ट्रेन रात्री 12:20 वा.
• विरार ते चर्चगेट शेवटची लोकल ट्रेन रात्री 12:05 वा.
