AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरपंच जोमात, पोलीस कोमात; मेसाई जवळगाच्या सरपंच हल्ल्याप्रकरणात मोठं ट्विस्ट

काही दिवसांपूर्वी धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर हल्ला झाला होता. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सरपंच जोमात, पोलीस कोमात; मेसाई जवळगाच्या सरपंच हल्ल्याप्रकरणात मोठं ट्विस्ट
| Updated on: Jan 02, 2025 | 3:52 PM
Share

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील काही आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना ताजी असतानाच धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर देखील हल्ला झाल्याची घटना घडली होती. आता या हल्ला प्रकरणाचा तपास सुरू असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीमुळे पोलिसांना देखील धक्का बसला आहे.

काही दिवसांपूर्वी धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर हल्ला झाला होता. काही गुंडांनी सरपंच नामदेव निकम यांची गाडी अडवून त्यांच्या वाहनावर अंडे आणि दगड फेकून  त्यांच्या वाहनाच्या काचा फोडल्या होत्या, तसेच त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर येत आहे.

ती म्हणजे तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा येथील सरपंच नामदेव निकम यांच्यावर झालेल्या हल्ह्याचा बनाव उघड झाला आहे.  बंदूक परवाना मिळवण्यासाठी सरपंचाने स्वतःच्या गाडीवर हल्ला केल्याचं समोर आलं आहे. हल्ल्यानंतर घटनास्थळाची पाहाणी आणि सरपंच नामदेव निकम यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चार जणांविरोधात तुळजापूर पोलीस ठाणयात गुन्हा दाखल झाला होता. तुळजापूर तालुक्यातील व्होनाळा ते जवळगा मेसाई रोडने त्यांची कार क्र. MH 12 QT 7790 जात असताना हा हल्ला झाला होता.

मात्र तपासामध्ये घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण केले असता घटनास्थळावरील परिस्थिती आणि फिर्यादी यांनी सागितलेली घटना यामध्ये पोलिसांना विसंगती आढळून आली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी या गुन्ह्याचा तांत्रीक पद्धतीनं तपास केला. यासाठी त्यांनी सरपंच नामदेव निकम व साक्षीदार प्रविण इंगळे या दोघांना विश्वासात घेवून अधिक तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली.  बंदुकीचे लायसन्स काढण्यासाठी स्वत:वरच हल्ला घडवून आणण्याचा बनाव करण्यात आल्याचं समोर आलं आहे. याबाबत पोलिसांकडून माहिती देण्यात आली.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.