AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Meteor Shower or Satellite ? : आकाशातून पडताना तुम्हाला दिसलं ते नेमकं काय? शोध लागला? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

आकाशातून पडणारी वस्तू किंवा वस्तूचे अवशेष हे इलेक्ट्रॉन रॉकेट बुस्टरचे तुकडे असल्याचं औरंगाबादेतील एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी म्हटलंय.

Meteor Shower or Satellite ? : आकाशातून पडताना तुम्हाला दिसलं ते नेमकं काय? शोध लागला? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत
महाराष्ट्र विविध भागात आकाशातून काहीतरी पडताना दिसलंImage Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Apr 02, 2022 | 11:51 PM
Share

औरंगाबाद : राज्यात शनिवारी संध्याकाळी बऱ्याच ठिकाणी आकाशातून काहीतरी पडताना दिसलं. हा उल्कापात (Meteor Shower) होता की अजून काही? यावर अद्याप अभ्यास आणि चर्चा सुरु आहे. मात्र, या घटनेमुळे नागरिकांच्या मनात भीती (Fear) आणि उत्सुकता पाहायला मिळतेय. राज्यात वाशिम, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, उस्मानाबाद, लातूर अशा विविध भागातील नागरिकांना संध्याकाळच्या सुमारास आकाशातून काहीतरी पडताना पाहायला मिळालं. ती वस्तू जळताना दिसत असल्यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली होती. मात्र, पडणारी वस्तू नेमकी काय आहे? याची नेमकी माहिती अद्याप कळू शकलेली नाही. असं असलं तरी आकाशातून पडणारी वस्तू किंवा वस्तूचे अवशेष हे इलेक्ट्रॉन रॉकेट बुस्टरचे तुकडे (Rocket booster pieces) असल्याचं औरंगाबादेतील एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी म्हटलंय.

ती वस्तू म्हणजे इलेक्ट्रॉन राॅकेट बुस्टरचेच तुकडे?

न्यूझीलंड येथील माहीया द्वीपकल्पावरुन भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6 वाजून 11 मिनिटांनी तेथील रॉकेट लॅब कंपनीच्या इलेक्ट्रॉन रॉकेटद्वारे ब्लॅकस्काय नावाचा उपग्रह पृथ्वीच्या 430 किलोमीटर उंचीवर नेऊन स्थिरावण्यात आला. आजच्या तारखेत केवळ एकाच रॉकेट उड्डाणाची नोंद आहे. त्यामुळे आज सायंकाळी उत्तर – पुर्व महाराष्ट्रात दिसलेली वस्तू ही या इलेक्ट्रॉन रॉकेटच्या बुस्टरचेच असावी. आपल्या भागात साधारण 30 ते 35 किमी उंचीवरून बुस्टरचे वातावरणाशी घर्षण झाल्याने एकामागोमाग एक असे ते जळत गेले. दिसणार्‍या घटनेचा मार्ग आणि प्रकाशमान याचा अंदाज घेतला तर ही कोणताही उल्का वर्षाव किंवा उडती तबकडी सारखी घटना नाही हे निश्चित असल्याचं औंधकर म्हणाले.

लोकांना आकाशात नेमकं काय दिसलं?

राज्यातील विविध भागात नागरिकांना रात्री 8 च्या सुमारास तीन ते चार जळालेल्या अवस्थेतील वस्तू आकाशातून कोसळताना पाहायला मिळाल्या. या वस्तू पडत असताना जळत असलेल्या या वस्तूंच्या मागे रॉकेटप्रमाणे जाळ/धूर दिसत होता. आकाशातून पडत असलेल्या या वस्तू पाहून उल्कापात होत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. तर अनेकांनी विमान अपघात, त्याचबरोबर उपग्रह कोसळल्याचा अंदाजही बांधला होता. मात्र, आकाशातून पडत असलेली वस्तू नेमकी काय होती? याची ठोस माहिती द्याप कळू शकलेली नाही.

इतर बातम्या : 

Meteor Showers or Satellite Video: ऐन गुढीपाडव्याच्या रात्री विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात उल्कावर्षाव, चंद्रपूर, वाशिम, अकोल्यातले व्हिडीओ वेगानं पसरले

Chandrapur Meteor Showers or Satellite ring Video: चंद्रपूरमध्ये उल्कावर्षाव की उपग्रह पडला? नेमकं काय घडलंय?

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.