AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrapur Meteor Showers or Satellite ring Video: चंद्रपूरमध्ये उल्कावर्षाव की उपग्रह पडला? नेमकं काय घडलंय?

चंद्रपूर (Chandrapur) पासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंदेवाही (Sindewahi) तालुक्यात उल्कापिंड कोसळल्याची ही चर्चा आहे. या ठिकाणी मोठाल्या आकाराच्या लोखंडी रिंग आकाशातून पडल्याची चर्चा आहे.

Chandrapur Meteor Showers or Satellite ring Video: चंद्रपूरमध्ये उल्कावर्षाव की उपग्रह पडला? नेमकं काय घडलंय?
चंद्रपूरमध्ये काय पडलं उपग्रह की उल्कापातImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 02, 2022 | 10:15 PM
Share

चंद्रपूर: चंद्रपूर (Chandrapur) पासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंदेवाही (Sindewahi) तालुक्यात उल्कापिंड कोसळल्याची ही चर्चा आहे. या ठिकाणी मोठाल्या आकाराच्या लोखंडी रिंग आकाशातून पडल्याची चर्चा आहे. खगोल अभ्यासकांनी हा पृथ्वीच्या कक्षेत आलेला उपग्रह असल्याची शंका वर्तवली आहे. चंद्रपूर व लगतच्या गडचिरोली जिल्ह्यातही अशाच प्रकारे आकाशातून लाल झोत खाली कोसळत असल्याचे दिसले चित्र समोर आले आहे. आताच थोड्यावेळापूर्वी आकाशातून खूप मोठी वस्तू जळत खाली पडल्याचे व्हिडीओ आणि फोटो मी पाहिलेले आहेत. जुनं सॅटेलाईट (Satellite Ring) पृथ्वीच्या कक्षेत खेचलं जाऊन त्याचे तुकडे तुकडे होऊन जळत खाली आले असल्याची शक्यता आहे. फोटो आणि व्हिडीओवरुन असं वाटतंय. मोठी उल्का पृथ्वीकडे खेचत आली तर तसं होऊ शकतं. मात्र, दृश्यावरुन असं दिसतंय की ते जुन्या सॅटेलाईटचं भाग असावेत, असं खगोलाशास्त्रज्ञ यांनी सांहगितलं आहे,

पाहा व्हिडीओ

ज्या प्रकारचे व्हिडीओ आणि फोटो येत आहेत त्यावरुन ते सॅटेलाईट असावं असा अंदाज सुरेश चापणे यांनी सांगितंलं आहे. एखाद्या देशानं सॅटेलाईट पाडलं असावं, असा अदाज व्यक्त करण्यात आला आहे. लोकांमध्ये भीती असेल मात्र उल्कापात होतो त्यावेळी खूप मोठा गोळा खाली पडताना दिसतो. लोकांनी भीती बाळगण्याची गरज नाही, हे अरबी समुद्रात पडलं असावं.चंद्रपूरला सिंदेवाहीमध्ये एक तुकडा आकाशातून पडल्याची माहिती आहे. तो तुकडा कशाचा आहे याचं कन्फर्मेशन झालेलं नाही. महाराष्ट्रात चिंतेचं आणि उत्सुकतेचं वातावरण आहे. पण लोकांनी घाबरु नये, असं आवाहन सुरेश चोपणे यांनी केलं आहे.

पाहा व्हिडीओ

चंद्रपूरचे जिल्हाधिकारी काय म्हणाले?

चंद्रपूरमध्ये सापडेलेली रिंग ही ट्रॅक्टरमधून आता प्रशासननाकडून नेण्यात आली आहे. यानंतर प्रशासन ती रिंग नेमकी कशाची आहे यासंदर्भात अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सिंदेवाही तालुका आहे लाहाडबोरी आहे. त्या गावात आठ ते दहाफुट डायमीटर असलेली रिंग पडलेली आहे. लोकांनी गर्दी केल्यानं ती रिंग संदर्भात अधिक माहिती आलेली नाही. आपत्ती व्यवस्थापन कक्ष, मुंबईला कळवण्यात येईल. सोलर डस्कनं सॅटेलाईटला हीट केल्यास अशा प्रकारचं घटना घडतात, असं मी गुगलवर पाहिलं होतं, असं अजय गुल्हाणी यांनी म्हटलं. त्या रिंगची तपासणी केल्यानंतर आणि ती रिंग सॅटेलाईटची रिंग आहे का हे पाहावं लागेस,असं अजय गुल्हाणी यांनी म्हटलं आहे.

जळगावातही ती घटना कॅमेऱ्यात कैद

जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी उल्कापात दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे दरम्यान अनेकांनी उल्कापात होताना आपल्या मोबाईल च्या कॅमेऱ्यात उल्कापात कैद केले असून सोशल मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणात उल्कापात चे व्हिडिओ व्हायरल होत असल्याने अनेकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. मात्र नेमके या उल्का कुठे पडल्या या अद्याप समजू शकले नाही. जळगाव शहरासह मुक्ताईनगर चोपडा या भागात अनेकांनी उल्कापात पाहिल्याचा दावा केला आहे

अकोला जिल्हातल्या अनेक ठिकाणी उल्कापात दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे दरम्यान अनेकांनी उल्कापात होताना आपल्या मोबाईल च्या कॅमेऱ्यात उल्कापात कैद केला असून सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. अनेक ठिकाणी ग्रामीण भागात ही तबकडी असल्याचे बोलल्या जातं आहे…पण नेमक काय आहे हे समजू शकले नाही….

इतर बातम्या :

Maharashtra Meteor Showers Video: ऐन गुढीपाडव्याच्या रात्री विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात उल्कावर्षाव, चंद्रपूर, वाशिम, अकोल्यातले व्हिडीओ वेगानं पसरले

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.