लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना स्वतंत्र बँक अकाऊंट उघडण्याची अट का ठेवली?; पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना महिलांसाठी स्वतंत्र बँक अकाऊंटची अट ठेवली आहे. ती अट नेमकी का ठेवण्यात आली आहे? याचा खुलासा स्वत: राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केला आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना स्वतंत्र बँक अकाऊंट उघडण्याची अट का ठेवली?; पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
Follow us
| Updated on: Aug 12, 2024 | 9:03 PM

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा येत्या 17 ऑगस्टला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. या योजनेचा अर्ज भरताना महिलांसाठी स्वतंत्र बँक अकाऊंटची अट ठेवली आहे. ती अट नेमकी का ठेवण्यात आली आहे? याचा खुलासा स्वत: राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केला आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने शहापूर येथे महिला संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी स्वतंत्र बँक अकाउंटच्या अटीबद्दल खुलासा केला. “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी राबविली जाणार आहे. या योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टला जमा होणार आहे. राज्यातील 1 कोटी पेक्षा जास्त महिलांना याचा लाभ मिळणार आहे”, अशी माहिती आदिती तटकरे यांनी यावेळी दिली.

“मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे १७ ऑगस्टला संबंधित लाभार्थी महिलेच्या खात्यावर थेट जमा होणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तयार करताना डोळ्यासमोर एकच हेतू होता की, गरजू महिलांना हक्काचे पैसे मिळावेत. कुटुंबाच्या गरजा भागवताना महिलांच्या अनेक इच्छा अपूर्ण राहतात. त्या इच्छा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून पूर्ण होणार आहेत. या पैशांवर फक्त महिलांचाच अधिकार असावा म्हणून महिलांचे स्वतंत्र बँक खाते ही अट ठेवली आहे”, असा खुलासा आदिती तटकरे यांनी केला. “ज्या महिलांनी बँक खाते काढले नसेल त्यांनी तात्काळ बँक खाते काढून 31 ऑगस्ट पूर्वी मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरावा”, असं आवाहनदेखील आदिती तटकरे यांनी केलं.

अंगणवाडी सेविकांना प्रत्येक अर्जासाठी 50 रुपये मानधन

“कोविड काळात अंगणवाडी सेविकांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आपण ग्रॅज्युएटी देणार आहोत. तसेच केंद्र शासनाकडे मानधन वाढीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. १ लाख १४ हजार महिलांना स्मार्टफोन देण्यात आले आहे. ४ लाखांपेक्षा जास्त शालेय गणवेश शिवण्याचे काम महिला बचतगटांना देण्यात आले आहे. त्यातून प्रत्येक गणवेश शिवण्यामागे प्रत्येक महिलेला ११० रुपये मिळत आहे. यातून महिलांना रोजगार मिळत आहेत. अंगणवाडी सेवकांना मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेचे प्राप्त अर्ज भरल्यास प्रत्येक अर्जासाठी ५० रुपये देण्यात येत आहेत”, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.

“कायापालट लोकसंचलित केंद्र चांगले काम करीत आहे. यातून अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे. हे केंद्र करीत असलेल्या कामकाजासाठी शासनाकडून प्रशासकीय खर्चाची तरतूद करण्यात यावी”, अशी विनंती आमदार दौलत दरोडा यांनी मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे केली. तर “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ३१ ऑगष्ट पर्यंत सर्व पात्र महिलांनी अर्ज भरून घ्या. अफवांवर विश्वास ठेवू नका. ही योजना कायमस्वरूपी सुरु राहणार आहे”, असं माजी खासदार आनंद परांजपे म्हणाले.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.