AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्री छगन भुजबळ यांचे मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल मोठे विधान, थेट म्हणाले, ओबीसी आरक्षण..

छगन भुजबळ यांनी नुकताच मोठे विधान केले. त्यांनी ओबीसी आंदोलनावर भाष्य केले. मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दलही बोलताना छगन भुजबळ दिसले. ज्याची आता तूफान चर्चा होत आहे.

मंत्री छगन भुजबळ यांचे मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल मोठे विधान, थेट म्हणाले, ओबीसी आरक्षण..
Chhagan Bhujbal Manoj Jarange Patil
| Updated on: Aug 23, 2026 | 6:05 PM
Share

मंत्री छगन भुजबळ यांनी नुकताच मोठे विधान केले. छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल हे विधान केले. छगन भुजबळ यांनी म्हटले की, ओबीसीचे आरक्षण संपले कोण म्हणते. जात पडताळीमध्ये चुका असेल तर त्यावर आम्ही लढतोय.  2011 पासून जात जनगणना करावी ही आमची मागणी होती, त्यावर सरकारने निर्णय घेतला आहे. सरकार आमच्यासोबत आहे, त्यावर आम्ही आता काय बोलणार. महात्मा फुले यांचे वांगमय भाषण यावर आम्ही मागणी केली. त्यावर सरकार करत आहे. जरांगे पाटील यांच्याबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की, मनोज जरांगे यांची लढाई आमच्या विरोधात नाही त्यावर आम्ही काय बोलणार. सरकार त्यावर बोलेल आणि निर्णय घेईल. आम्ही जात गणना मागणी केली त्यावर सरकार काम करत आहे. ओबीसीमध्ये किती जात त्यावर निर्णय सरकार घेणार आहे.

छगन भुजबळांनी लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत हाकेंचे सर्व आरोप फेटाळले. जरांगे यांचा लढा आमच्याविरोधात नाही तर शासनाविरोधात आहे, त्यामुळे आम्ही मध्ये जाऊन आ बेल मुझे मार करण्याची गरज काय ? ओबीसींना अनेक कामे शांतपणे करून मिळत आहेत, तर आम्ही मोर्चा कशासाठी काढू ? भुजबळांचा सवाल.

जेव्हा लढायचे तेव्हा भुजबळ राजीनामा देऊन अंबड, नगर, पंढरपूर, हिंगोली इथे फिरला होता, महामोर्चे काढले होते.  छगन भुजबळ घाबरले असे नाही, सरकार आमच्यासोबत आहे आणि आम्ही चर्चेतून मार्ग काढतो आहे,  2011 पासून जातगणनेची आमची मागणी होती त्यानुसार निर्णयही घेण्यात आला आहे, असे भुजबळांनी म्हटले.

एल निनोबद्दल बोलताना छगन भुजबळ यांनी म्हटले की, एल निनोचा मोठा प्रादुर्भाव सर्वत्र दिसत आहे. काही ठिकाणी प्रचंड पाऊस झाला आहे तर काही ठिकाणी पाऊसच नाही. पुन्हा उष्णता वाढलेली आहे, हा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आहे. जे कोणी नेते आहे ज्यांना निवडणूक लढवायची आहे, त्यांनी यावर काम केले पाहिजे. सरकारच्या सोबत काम केले पाहिजे.

अंगणवाडी कृती समितीवर बोलताना छगन भुजबळ यांनी म्हटले की, तुकाराम मुंढे चांगले काम करत आहेत. अन्न हा असा प्रकार आहे श्रीमंत गरीब त्यामुळे सर्वांकडे आवश्यक असलेल्या प्रकार आहे. स्वच्छता असणे हे त्यासाठी महत्त्वाचे आहे. तुकाराम मुंढे ज्यावर बोट ठेवतात त्यावर सगळेच मागणी करतात तशीच मागणी अंगणवाडी समितीने केली.

Follow Us
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात