AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin yojana : लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , डिसेंबरच्या हप्त्याबाबत आदिती तटकरे काय म्हणाल्या ?

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : जुलैमहिन्यातील अर्थसंकल्पात महायुती सरकारने 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची' घोषणा केली. त्या अंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात गेल्या 5 महिन्यात 7500 रुपये जमा झाले आहेत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता तर एकत्रच जमा झाल्याने महिलांना 3000 रुपये एकत्र मिळाले होते. आता डिसेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

Ladki Bahin yojana : लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , डिसेंबरच्या हप्त्याबाबत आदिती तटकरे काय म्हणाल्या ?
| Updated on: Dec 24, 2024 | 2:26 PM
Share

विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळण्यास कारणीभूत ठरलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ ही योजना गेमचेंजर ठरल्याचे महायुतीतील अनेक नेत्यांनी नमूद केलं. जुलै महिन्यात या योजनेची घोषणा करण्यात आली, त्या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा करण्यात येतात. त्यानुसार गेल्या 5 महिन्यात कोट्यवधी लाभार्थी महिलाना 7500 रुपये मिळाले आहेत. आचरसंहितेमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे तर या महिलांच्या खात्यात एकदमच जमा झाल्याने त्यांना 3000 रुपये एकत्र मिळाले. एवढंच नव्हे तर आमचं सरकार पुन्हा निवडून आल्यास लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपये देऊ असं महायुतीतर्फे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सांगण्यात आलं होतं.

विधानसभा निवडणुका पार पडल्या, निकाल लागले, महायुतीच्या मंत्रीमंडळाचा शपथविधीही आता पार पडला असून निवडणुकीनंतर आता पहिल्यांदाच या योजनेचे पैसे मिळणार आहे. डिसेंबरच्या हप्त्याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी डिसेंबरच्या हप्त्याबाबत मोठी माहिती दिली आहे. आजपासूनच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता डीबीटीद्वारे लाभार्थी महिलांच्या अकाऊंटमध्ये जमा होणार असल्याचे तटकरे यांनी नमूद केलं आहे.

काय म्हणाल्या अदिती तटकरे ?

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ‘X’ या सोशल मीडिया नेटवर्किंग साईटवर एक ट्विट करत या योजनेबद्दल अपडेट्स दिले आहेत. ‘ महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकत, आज मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस , उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना यशस्वीपणे चालू आहे. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून टप्प्याटप्प्याने पात्र भगिनींना सन्मान निधी वितरित करण्यास सुरुवात झाली आहे.’ असे अदिती तटकरे यांनी म्हटले आहे.

ही योजना विशेष का आहे याबद्दलही अदिती तटकरे यांनी नमूद केलं आहे.

ही योजना का विशेष आहे ?

1) आर्थिक आधार: महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाला स्थैर्य देण्यासाठी आधार.

2) सन्मानाचा भाव: केवळ निधी देण्यापुरती ही योजना मर्यादित नसून महिलांच्या आत्मसन्मानाला प्रोत्साहन देणारी आहे.

3) सशक्तीकरण: महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न, जो त्यांच्या जीवनाचा स्तर उंचावण्यात मदत करतो.

मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी सुरू झालेल्या या उपक्रमाचा आजचा टप्पा पूर्ण करताना महिलांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून मन भरून येतं. हा निधी त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवेल, अशी आशा अदिती तटकरे यांनी व्यक्त केली आहे.

महिलांना 1500 रुपये मिळणार की 2100 ?

राज्यांत महायुतीचं सरकार पुन्हा आलं तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपये देऊ असं आश्वासन नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिलं होतं. त्यानुसार 2100 रुपये कधी मिळणार असा सवाल लाभार्थी महिलांच्या मनात आहे. मात्र या डिसेंबर महिन्यात मात्र पूर्वीप्रमाणेच 1500 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार असून 2100 रुपये मिळण्यासाठी त्यांना आणखी काही काळ वाट पहावी लागेल असे दिसते. अर्थसंकल्पात त्याची तरतूद करण्यात येणार असून पुढल्या वर्षी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच बहिणींच्या खात्यात 2100 रुपये जमा होतील अशी चर्चा आहे.

BMC निवडणुकीनंतर...महायुतीच्या भविष्यावर रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य
BMC निवडणुकीनंतर...महायुतीच्या भविष्यावर रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य.
तू अजून जिवंत? BJP नेत्याला तुकाराम मुंढेंच्या इशाऱ्यावरून पुन्हा धमकी
तू अजून जिवंत? BJP नेत्याला तुकाराम मुंढेंच्या इशाऱ्यावरून पुन्हा धमकी.
दानवेंच्या व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती खरंच शिवसेनेचा आमदार?
दानवेंच्या व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती खरंच शिवसेनेचा आमदार?.
दमानियांचे ते आरोप खोटे? निलेश मगर म्हणाले त्या व्यवहाराशी माझा संबध..
दमानियांचे ते आरोप खोटे? निलेश मगर म्हणाले त्या व्यवहाराशी माझा संबध...
सामंत गुगली टाकण्यात हुशार, थातुरमातुर.... प्रकाश सुर्वेंचा घरचा आहेर
सामंत गुगली टाकण्यात हुशार, थातुरमातुर.... प्रकाश सुर्वेंचा घरचा आहेर.
विधानसभेत आसन व्यवस्थेवरून ठाकरेंची सेना अन् काँग्रेसमध्ये वाद
विधानसभेत आसन व्यवस्थेवरून ठाकरेंची सेना अन् काँग्रेसमध्ये वाद.
संदीप देशपांडेंकडून सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार उघड, थेट...
संदीप देशपांडेंकडून सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार उघड, थेट....
भास्कर जाधव विधानसभेत भडकले अन् कामकाजावरच आक्षेप, नेमकं घडलं काय?
भास्कर जाधव विधानसभेत भडकले अन् कामकाजावरच आक्षेप, नेमकं घडलं काय?.
तेव्हा अजित पवारांची सत्ता नव्हती, पण आता तर... दमानियांचा दावा काय?
तेव्हा अजित पवारांची सत्ता नव्हती, पण आता तर... दमानियांचा दावा काय?.
फडणवीस तेव्हा हुडी घालून मला.. शिंदेंनी सांगितला सेनाफुटीवेळीचा किस्सा
फडणवीस तेव्हा हुडी घालून मला.. शिंदेंनी सांगितला सेनाफुटीवेळीचा किस्सा.