AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MSRTC ST Employees strike : बैठक निष्फळ, सरकारला अपयश, एसटी कर्मचारी संपावर ठाम, ऐन गणेशोत्सवात खोळंबा होणार?

MSRTC ST Employees strike : एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसलं आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसल्यामुळे राज्य सरकारही चिंतेत आहे. राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसोबत एक बैठकही घेतली. पण या बैठकीत राज्य सरकारला अपयश आलं.

MSRTC ST Employees strike : बैठक निष्फळ, सरकारला अपयश, एसटी कर्मचारी संपावर ठाम, ऐन गणेशोत्सवात खोळंबा होणार?
MSRTC ST Employees payment before diwali
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Sep 03, 2024 | 5:51 PM
Share

एसटी कर्मचारी कृती समितीची राज्य सरकारसोबतची बैठक निष्फळ ठरली आहे. या बैठकीत तोडगा निघाला नाही. त्यामुळे एसटी कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. एसटी कर्मचारी आज रात्री बारा वाजेपासून संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर कर्मचाऱ्यांनी संप करु नये, असं आवाहन मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांची उद्या संध्याकाळी सात वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. पण त्याआधी आज मंत्री उदय सामंत आणि एसटी कर्मचारी कृती समितीची बैठक पार पडली. या बैठकीत उदय सामंत यांनी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याबाबतचं आवाहन केलं. पण कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांसोबतची सरकारची ही बैठक निष्फळ ठरली आहे.

गणेशोत्सव तोंडावर असताना एसटी कर्मचारी आज रात्रीपासून संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे सत्तेत असणारे आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचा एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा आहे. दुसरीकडे मंत्री उदय सामंत यांनी मध्यस्थी करत ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांची गैरसोय नको. त्यामुळे संप मागे घ्या, अशी विनंती केली. पण एसटी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर जाण्यास आग्रही आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एसटी कर्मचारी कृती समितीची उद्या संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडणार आहे. या बैठकीत तोडगा निघतो का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय?

  • राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला वेतन मिळावं.
  • राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच महागाई भत्ता मिळावा.
  • राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच घरभाडं भत्ता मिळावा.
  • एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट 5 हजार रुपयांची वेतनवाढ मिळावी.

एसटी कृती समितीचे संदीप शिंदे काय म्हणाले?

“मुख्यमंत्र्यांची बैठक होऊन अंतिम निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती एसटी कर्मचारी कृती समितीचे नेते संदीप शिंदे यांनी दिली. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या संपावरुन एसटी कर्मचाऱ्यांवर टीका केली. त्यांच्या टीकेला संदीप शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. स्वत:चा टीआरपी वाढवून झालाय, स्वत:चा गल्ला मोजून झालाय, पैसे मोजायची मशीन घरात आणली आहे”, अशी टीका संदीप शिंदे यांनी केली.

गुणरत्न सदावर्ते काय म्हणाले?

“संघटना म्हणून तुम्ही जी काय कृती समिती म्हणत आहे, मी तिला कृती नाही तर किडे समिती मानतो. किडे लागलेले होते, हे लोकं 5 टक्के मलई खाणारे लोकं आहेत. तुम्ही लढो हम कपडे संभालते हैं, असं म्हणणारा संदीप याने चॅनलसमोर येऊन सांगावं की, त्याने संप आहे हे लिहून दिलं आहे म्हणून. ही शरद पवारांची बेगडी असते त्या पॉलिसीची माणसं आहेत. त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे एसटीतला कष्टकरी हा संविधान साक्षर आहे”, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं