AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदे समर्थक आमदार म्हणतात, मी मुख्यमंत्र्यांना घाम फोडतो…तर माझेच 100 आमदार असते

maharashtra assembly election 2024: गरिबांचे शिक्षण वेगळे झाले आणि शेतकऱ्यांचे पोर वेगळे झाले. या भागात पाणी पडते पण त्याचे पाणी दुसऱ्याकडे जाते. आतापर्यंत बोरसे यांच्यासारख्या लोकांना निवडणूक दिले. पण त्याचा काही फायदा नाही.

एकनाथ शिंदे समर्थक आमदार म्हणतात, मी मुख्यमंत्र्यांना घाम फोडतो...तर माझेच 100 आमदार असते
एकनाथ शिंदे
| Updated on: Nov 16, 2024 | 4:53 PM
Share

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानास अवघे काही दिवस राहिले आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीपूर्वी कधी एकत्र असलेले पक्ष आणि आमदार आता एकमेकांच्या विरोधात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार आणि प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे. सटाणा येथील प्रचारसभेत बोलताना बच्चू कडू मुख्यमंत्र्याला घाम फोडून टाकतो, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. तसेच मी जर जातीचे राजकारण केले असते तर माझेच १०० आमदार निवडून आणले असते. परंतु मी शेतकरीच राजकारण करतो, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

बच्चू कडू म्हणाले, आताची राजकीय अवस्था अशी आहे की कुठल्याही पक्षाची सत्ता येणार नाही. माझ्या विरोधात काँग्रेसने भाजपाला पाठिंबा दिला आहे. परंतु आता आमचे शिवाय सरकार बनणार नाही. आमचा पक्ष लहान असला तरी काम त्या मोठ्या पक्षांपेक्षा मोठे आहे.

कांद्याने दिला झटका

बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांना उद्देशून बच्चू कडू म्हणाले, येथे धमक्या दिल्या जातात. परंतु त्यांना माहीत नाही, आमच्या पक्षाचे नावच प्रहार आहे. त्यामुळे किमान धमक्या देऊ नका. खरं पाहिलं तर शेतकरी संकटात आहे. देशात सर्वात जास्त आत्महत्या शेतकरी आणि तरुण करत आहेत. स्वामिनाथन आयोग आम्ही स्वीकारला तेव्हा शरद पवार कृषिमंत्री होते. तेव्हापासून आतापर्यंत मोदींनी देखील शेतकऱ्यांच्या शेत पिकाला भाव दिला नाही. कुणीही हमीभाव दिला नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी निर्यात बंदी केली गेली होती. कांद्याविषयी कोणीही लोकसभेत बोलले नाहीत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कांदा उत्पादकांनी दणका दिला आणि भाजपचा खासदार पडला. आताही कांद्याला भाव नाही तर मत नाही अशी पाटी घरावर लावा.

गरिबांचे शिक्षण वेगळे झाले आणि शेतकऱ्यांचे पोर वेगळे झाले. या भागात पाणी पडते पण त्याचे पाणी दुसऱ्याकडे जाते. आतापर्यंत बोरसे यांच्यासारख्या लोकांना निवडणूक दिले. पण त्याचा काही फायदा नाही. शेतकरी म्हणून कोणीही नेता पुढे नेत नाहीत, असे बच्चू कडू यांनी सांगितले.

राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.