शरण आलेल्या आमदार नितेश राणे यांना अटक

नितेश राणे यांनी स्वत:हून कणकवली पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. उपअभियंते प्रकाश शेडेकर यांनी नितेश राणे यांच्याविरोधात कुडाळ पोलिसात तक्रारी दाखल केली होती.

शरण आलेल्या आमदार नितेश राणे यांना अटक

सिंधुदुर्ग : रस्त्याच्या दुरावस्थेमुळे उपअभियंत्याला धक्काबुक्की करुन, चिखलांच्या बादल्या अंगावर ओतणं आमदार नितेश राणे यांना महागात पडलं आहे. आमदार नितेश राणे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. नितेश राणे यांनी स्वत:हून कणकवली पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. नितेश राणे आणि त्यांच्या अन्य दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे. त्यांना उद्या कोर्टात हजर केलं जाणार आहे.

उपअभियंते प्रकाश शेडेकर यांनी नितेश राणे यांच्याविरोधात कुडाळ पोलिसात तक्रारी दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर  महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर नितेश राणे यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी नितेश राणेंच्या घराबाहेर फौजफाट्यासह हजेरी लावली. त्यावेळी दंगल नियंत्रणपथकही उपस्थित होतं.


कुडाळ पोलीस ठाण्यात आमदार नितेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध 353,342,143,148,149 या कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये आमदार नितेश राणे, मिलींद मेस्त्री, संदीप सावंत, निखीला आचरेकर, मामा हळदीवे, मेघा गांगण यांचा समावेश आहे.

गेल्या काही वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावं लागतं. त्यामुळे आमदार नितेश राणे यांनी आक्रमक पावित्रा घेत उपअभियंत्याला धक्काबुक्की केली. आक्रमक झालेल्या नितेश राणेंनी उपअभियंते प्रकाश शेडेकर यांना पुलाला बांधण्याच्या प्रयत्न करुन, थेट हायवेवरील चिखलाने आंघोळ घातली.  नितेश राणेंनी शेडेकर यांना शिव्यांची लाखोली वाहिली.

मी माफी मागतो : नारायण राणे

दरम्यान, भाजपचे सहयोगी खासदार आणि नितेश राणे यांचे वडील नारायण राणे यांनी नितेश राणेंच्या कृत्याबद्दल स्वत: माफी मागितली आहे. “नितेशने आंदोलन केलं. मात्र चिखल फेकला म्हणून मी अधिकाऱ्याची माफी मागतो. शिवाय नितेशलाही माफी मागायला सांगेन”, असं नारायण राणे म्हणाले.

नेमकं प्रकरण काय आहे?

गेल्या काही वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावं लागतं. त्यामुळे आमदार नितेश राणे यांनी आक्रमक पावित्रा घेत उपअभियंत्याला धक्काबुक्की केली.  आक्रमक झालेल्या नितेश राणेंनी उपअभियंते प्रकाश शेडेकर यांना पुलाला बांधण्याच्या प्रयत्न करुन, थेट हायवेवरील चिखलाने आंघोळ घातली.  नितेश राणेंनी शेडेकर यांना शिव्यांची लाखोली वाहिली.

मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था झाली आहे. रस्त्यात अनेक ठिकाणी पडलेले खड्डे, जागोजागी पसरलेले खडीचे साम्राज्य, तसेच सातत्याने अपघात होत असतात. त्यामुळे नितेश राणे यांनी सिंधुदुर्गात जाऊन उप अभियंता प्रकाश शेडेकर यांची भेट घेतली. त्यानंतर आक्रमक झालेल्या राणेंनी शेडेकर यांना हाताला धरुन महामार्गाची जबरदस्तीने पाहणी करायला लावली. पाहणी झाल्यानंतर त्यांनी शेडेकर यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या अंगावर चिखलाच्या बादल्या ओतल्या. एव्हढंच नव्हे तर त्यांना महामार्गाला बांधून ठेवण्याचा प्रयत्नही करण्यात आला.

संबंधित बातम्या 

VIDEO : नितेश राणेंकडून उपअभियंत्याला पूलाला बांधून चिखलाची अंघोळ   

नितेश तू चुकलास, मी माफी मागतो : नारायण राणे  

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *