अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी मनसे आमदार राजू पाटलांकडून अडीच लाखांची मदत

अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी 2 लाख 51 हजार रुपयांचा धनादेश मदत म्हणून दिला आहे. (MNS MLA Raju Patil donation for Ayodhya Ram temple)

अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी मनसे आमदार राजू पाटलांकडून अडीच लाखांची मदत

कल्याण (ठाणे) : अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी 2 लाख 51 हजार रुपयांचा धनादेश मदत म्हणून दिला आहे. राजू पाटील यांनी स्वत: आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबत माहिती दिली आहे. राम मंदिर उभारण्याच्या या पवित्र कार्यात खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य प्राप्त झाले, असं राजू पाटील म्हणाले आहेत (MNS MLA Raju Patil donation for Ayodhya Ram temple).

“आज जगभरातील सकल हिंदू समाज एकवटून अयोध्येतील ‘श्रीराम मंदिर निर्माण निधी’ संकलन करून यथाशक्ती योगदान देत आहे. काल मला पण या पवित्र कार्यात खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य प्राप्त झाले. गणेश मंदिर ट्रस्टी अच्युत कराडकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कल्याण जिल्हाप्रमुख अण्णा गाणार, संघ कार्यकर्ते उदय कुलकर्णी, सुरेश फाटक यांची भेट घेऊन त्यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला आणि प्रभू श्रीराम मंदिराची छोटी प्रतिकृती भेट दिली”, असं राजू पाटील ट्विटरवर म्हणाले.


राम मंदिरासाठी टीव्ही 9 नेटवर्ककडूनही मदत

राम मंदिर उभारण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून जनतेकडून भरभरून मदत मिळत आहे. अनेक लोक स्वत:हून पुढे येऊन राम मंदिरासाठी मोठं योगदान देत आहेत. सामान्य माणसांपासून ते उद्योगपतींपर्यंत सर्वांनीच राम मंदिरासाठी आपले हात मोकळे सोडले आहेत. त्यातच टीव्ही 9 नेटवर्कच्या प्रोमोटर्संनी राम मंदिराच्या उभारणीसाठी 11 कोटींचा चेक सुपूर्द केला आहे. माय होम ग्रुपचे चेअरमन रामेश्वर राव यांनी 5 कोटी तर मेघा इंजीनियरिंगचे सीएमडी कृष्णा रेड्डी यांनी 6 कोटी रुपयांचं योगदान दिलं आहे.

राम मंदिरासाठी अनेकांकडून देणग्या

राम मंदिर उभारणीसाठी अनेक दिग्गजांनी देणग्या दिल्या आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पाच लाखाचा धनादेश दिला होता. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर निर्माण करण्यासाठी 1 लाख 11 हजार रुपयांचा चेक दिलेला आहे. तर, भाजप खासदार आणि क्रिकेटपटू गौतम गंभीर यांच्याकडून राम मंदिरासाठी 1 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे.

उद्धव ठाकरे तीन कोटी देणार

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेव्हा अयोध्येत गेले होते, तेव्हा त्यांनी राम मंदिराला 3 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यापैकी एक कोटी रुपयांचे ट्रान्झॅक्शन झालं आहे, अशी माहिती काही दिवसांपूर्वी विहिंपकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा : 

राम मंदिर निर्माणासाठी राज्यपाल कोश्यारींचा पुढाकार, 1 लाख 11 हजार रुपयांचा चेक

राम मंदिरासाठी राहुल गांधींकडूनही देणगी घेणार : विहिंप

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI