MLA Rohit Pawar : अतिरिक्त 2 हजार कोटी कोणाच्या खिशात? रोहित पवारांनी साधला सरकारवर निशाणा
Rohit Pawar On HSRP Number Plate : HSRP नंबर प्लेटच्या किमतीवरून आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. गुजरातच्या कंपनीच्या माध्यमातून 2 हजार कोटी कोणाच्या खिशात जाणार अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.
गुजरातची FTA कंपनी महाराष्ट्रात 550 रुपयांना नंबर प्लेट देणार आहे आणि हीच कंपनी गुजरातमध्ये 160 रुपयांना नंबर प्लेट देते. अतिरिक्त 2 हजार कोटी गुजरातच्या कंपनीच्या खिशात जाणार आहेत, अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. अतिरिक्त पैसा कंपनीच्या खिशात जातोय की मंत्र्यांच्या खिशात जातोय? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. HSRP नंबर प्लेटच्या किमतीवरून रोहित पवार यांनी आज सरकारवर निशाणा साधला आहे.
जी नंबर प्लेट FTAकंपनी गुजरातमध्ये 160 रुपयांना देते. तीच नंबर प्लेट महाराष्ट्रात ही कंपनी 550 रुपयांना देणार आहे. याचाच अर्थ सरकारच्या माध्यमातून गुजरातची कंपनी सामान्य जनतेच्या खिशातून अतिरिक्त 2 हजार कोटी रुपये काढणार आहे. हे पैसे कंपनीच्या खिशात जाणार की मंत्र्यांच्या हे सांगण्याची गरज आहे, असं रोहित पवार यांनी म्हंटलं आहे,
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं

