AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनंजय मुंडेंना करुणा शर्मा यांना 2 लाख रुपये देण्याचे आदेश, धसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले पहिली, दुसरी…

धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये द्यावेत असे आदेश न्यायालयानं दिले आहेत, त्यावर आता सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

धनंजय मुंडेंना करुणा शर्मा यांना 2 लाख रुपये देण्याचे आदेश, धसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले पहिली, दुसरी...
| Updated on: Feb 06, 2025 | 6:43 PM
Share

मंत्री धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये द्यावेत असे आदेश न्यायालयानं आज दिले. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. यावर आता भाजपचे आमदार सुरेश धस  यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले धस? 

मी अगोदरच सांगितलं होतं, करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत, असं मी मला वाटतं एका बाईटमध्ये म्हटलं होतं, आणि आता त्या पलिकडे आम्हाला काही बोलायचं नाही. त्यांची पहिली असो, दुसरी असो यावर आता आम्हाला काही चर्चा करायची नाही. आमचा फोकस हा संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हावी आणि देशमुख यांना न्याय मिळावा यावर आहे. ती आमची फस्ट प्रायोरेटी आहे. आणि महादेव मुंडे ते बिचारं 38 वर्षाचं लेकरू त्याचे लेकरबाळ रडत आहेत. महादेव मुंडे यांचे देखील मारेकरी सापडले पाहिजेत, ही आमची प्रायोरेटी आहे. धनंजय मुंडेंची पहिली बायको, दुसरी बायको आणखी काय काय, ते आम्हाला बोलू नका अन् विचारू नका, असं धस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान कोर्टानं हा निकाल दिल्यानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली होती. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं होतं की, कौटुंबीक हिंसाचार करणारा मंत्री मंत्रिमंडळात चालतो का? याबाबत धस यांना विचारले असता त्यांनी त्यावर प्रतिक्रिया देणं टाळलं. मी यावर प्रतिक्रियाच देणार नाही. मी जे बोलायचं ते बोललो. मला त्याचा फोकस दुसरीकडे जाऊच द्यायचा नाही, आमची प्रायरेटी काय आहे, 60 दिवस होऊ नाहीतर 61 दिवस होऊ आम्हाला आमचा संतोष ज्या पद्धतीने मारला, त्यांना न्याय मिळून देण्यावरच काम करायचं आहे. त्यावरच आता धनंजय देशमुख आणि आमची चर्चा झाली. आज संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सुरेश धस यांची भेट घेतली, या भेटीनंतर ते बोलत होते.

Follow Us
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?
राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे...
ताडदेव गृहप्रकल्प वाद; मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे नेते थेट...
अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा विलंबावर पलटवार
संसदीय वादंग: अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा १९ दिवसांच्या विलंबावर पलटवार
मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा; मुंबईत मराठ्यांना येण्याचे आवाहन
असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद अंतिम टप्प्यात. असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणी: धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
भावेश कावरेच्या वादग्रस्त जाहिरातीवरून राज्यात संताप: मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार
नीट परीक्षा आणि तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार