मनसेला राज्यात सर्वात मोठा धक्का, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

मोठी बातमी समोर येत आहे, महापालिका निवडणुकीपूर्वी मनसेला मोठा धक्का बसला आहे, मनसेमध्ये देखील नाराजी पहायला मिळत असून, बड्या नेत्यानं तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

मनसेला राज्यात सर्वात मोठा धक्का, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
मनसेला मोठा धक्का
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 29, 2025 | 5:05 PM

राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरवात झाली आहे. महापालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून, अनेक पक्षांमध्ये नाराजी नाट्य रंगताना पहायला मिळत आहे. मनसेला गेल्या काही दिवसांमध्ये धक्क्यावर धक्के बसत आहेत, काही दिवसांपूर्वीच मनसेचे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता, त्यानंतर आता मनसेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोडांवर मुंबईमधून मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची चर्चा सुरू होती, गेल्या आठवड्यात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युतीची अधिकृत घोषणा केली, त्यानंतर मनसेला दुसरा मोठा धक्का बसला आहे.

मनसेच्या सरचिटणीस स्नेहल जाधव यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. वॉर्ड क्रमांक १९२ मधून उमेदवारी जाहीर करताना विश्वासात न घेतल्याने त्या नाराज होत्या, याच नाराजीमधून त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर येत आहे. स्नेहल जाधव यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत सन १९९२ ते १९९७, १९९७ ते २००२ आणि २००२ ते २००७ या कालावधीत सलग तीन वेळा नगरसेविका म्हणून प्रतिनिधित्व केलेले आहे. त्यानंतर २००७ ते २०१२ या कालावधीत त्यांचे पती नगरसेवक म्हणून निवडून आले होते. वॉर्ड क्रमांक १९२ मधून कुटुंबाने सलग तीनवेळा नगरसेवकपदाची निवडणूक जिंकूनही मनसेकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याने स्नेहल जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे, त्यानंतर त्यांनी आपल्या सर्व पदाचा आणि मनसेचा राजीनामा दिला आहे. हा ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

इच्छुक नाराज 

दरम्यान अनेक ठिकाणी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती आणि आघाडीचं राजकारण पहायला मिळत असल्यामुळे अनेकांची तिकीट या निवडणुकीत कापली गेली आहेत, त्यामुळे ज्यांना तिकीट मिळालं नाही, असे सर्वच पक्षातील इच्छुक नाराज आहेत.