AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : ‘एकदा हातात सत्ता द्या, फक्त 48 तासात…’, राज ठाकरे काय म्हणाले?

Raj Thackeray : "कायद्याचा वचक नाही. मी पोलीस यंत्रणेला अजिबात दोष देणार नाही. त्यांच्यावरचा सरकारी दबाव त्यामुळे त्यांना तसं वागाव लागतं. पोलिसांनी काही गोष्टी करायला घेतल्या की त्यांचं निलंबन करणार. चौकशी लावणार"

Raj Thackeray : 'एकदा हातात सत्ता द्या, फक्त 48 तासात...', राज ठाकरे काय म्हणाले?
Raj Thackeray
| Updated on: Aug 23, 2024 | 1:38 PM
Share

“विधानसभेच्या निवडणुका लागल्या आहेत असं वाटतय. दिवाळीनंतर निवडणुका होतील. निवडणुका कधी होतील? काय होतील? याची कल्पना नाही. पण अंदाज आहे. म्हणून मी त्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून उमेदवार चाचपणी दौरा सुरु केला. मराठवाड्याचा दौरा केला. विदर्भाचा दौरा सुरु आहे. उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्राचा सुद्धा दौरा होईल” असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. तिथे ते यवतमाळ वणी येथे बोलत होते. यावेळच्या विधानसभा निवडणुकीला मनसे 200 ते 225 जागांवर उमेदवार उभे करणार आहे असं राज ठाकरे म्हणाले.

“एकूणच महाराष्ट्रातील राजकीय वातावरण गढूळ झालं आहे. चिखल झाला आहे. आजपर्यंत असं वातावरण महाराष्ट्रात कधी पाहिलं नव्हतं. तुम्ही निवडणुकीत या लोकांना मतदान करायचं, नंतर हे लोक विकली जातात. सध्या कोण कुठल्या पक्षात आहे, ते समजतच नाही. तुम्हाला याचा राग येतो की नाही? विधानसभा निवडणूक ही तो राग व्यक्त करण्याची जागा आहे” असं राज ठाकरे म्हणाले.

‘तसा गुन्हेगाराचा चौरंग करा’

“बदलापूरमध्ये मुलीवर शारीरिक अत्याचार झाला. बलात्काराचा प्रयत्न झाला. मनसेच्या महिला आघाडीने ती गोष्ट बाहेर काढली, तो पर्यंत ती गोष्ट दाबून ठेवली होती. लहान मुलींवर बलात्कार सुरु आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात चौरंगाची शिक्षा होती, तसा गुन्हेगाराचा चौरंग केला पाहिजे” असं राज ठाकरे म्हणाले.

‘पुन्हा कुठल्या बाईकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत होणार नाही’

“कायद्याचा वचक नाही. मी पोलीस यंत्रणेला अजिबात दोष देणार नाही. त्यांच्यावरचा सरकारी दबाव त्यामुळे त्यांना तसं वागाव लागतं. पोलिसांनी काही गोष्टी करायला घेतल्या की त्यांचं निलंबन करणार. चौकशी लावणार. मी हे गांभीर्यपूर्वक सांगतोय, एकदा हा महाराष्ट्र राज ठाकरेच्या हातात देऊन बघा, कायद्याची भिती काय असते ते दाखवून देईन. पुन्हा कुठल्या बाईकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत होणार नाही. फक्त 48 तास दिले, तर मुंबई पोलीस साफ करुन ठेवतील” असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला. यवतमाळ वणीमध्ये राज ठाकरे यांनी राजू उंबरकर यांची उमेदवारी यावेळी जाहीर केली.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.