पुण्यात मिड डे मिलमध्ये चक्क गुरांचा खुराक, मनसेच्या शिष्टमंडळाची शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार, पण लेकरं आणि गुरांचा फरक कळू नये?

पुण्यात शालेय विद्यार्थ्यांना दिला जाणाऱ्या मध्यान्न भोजनात चक्क गुरांचा खुराक असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

पुण्यात मिड डे मिलमध्ये चक्क गुरांचा खुराक, मनसेच्या शिष्टमंडळाची शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार, पण लेकरं आणि गुरांचा फरक कळू नये?
Follow us
| Updated on: Mar 19, 2021 | 10:58 PM

मुंबई : पुण्यात शालेय विद्यार्थ्यांना दिला जाणाऱ्या मध्यान्न भोजनात चक्क गुरांचा खुराक असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी मनसेचे पुण्यातील नेते आक्रमक झाले आहेत. त्यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या निकृष्ट दर्जाचा पोषण आहारासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतलीय. तसेच या प्रकारावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केलीय. तसेच कारवाई न केल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला (MNS complaint about Mid day meal in Pune to Education Minister Varsha Gaikwad).

“पुण्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणारा पोषण आहार हा पशुखाद्यांच्या पिशवीतून आलाय. तसेच या पोषण आहाराचा दर्जा देखील अत्यंत निकृष्ठ आहे,” असा आरोप मनसेने केलाय होता. मनसेने हा सगळा प्रकार उघडकीस आणल्यानंतर एफडीएने संबंधित धान्याचे गोडाऊन सील केले आहे. या विषयावर मनसेचे सरचिटणीस किशोर शिंदे यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळाने आज (19 मार्च) शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. यानंतर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले.

हा प्रकार कुठे घडला?

पशुखाद्याच्या पिशव्यांमधून शालेय मध्यान्न भोजन (पोषण आहार) देण्याचा प्रकार पुण्यातील महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 58 मध्ये घडला. प्रशासनावर शालेय पोषण आहार म्हणून पशुखाद्य पुरवण्यात आल्याचा आरोप होतोय. अन्न व औषध प्रशासनाने या पोषण आहारावर कारवाई करत गोडाऊन सील केलंय. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहळ यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केलीय. तसेच याची चौकशी करुन दोषींवर कारवाईची मागणी केलीय. त्यांनी शालेय पोषण आहार राज्य सरकार पुरवत असल्याचं म्हणत राज्याकडे चेंडू टोलवलाय.

कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळेच या काळात विद्यार्थ्यांना घरीच पोषण आहार देण्यात येतोय. मात्र, त्यातच हे प्रकरण समोर आल्याने पोषण आहार पुरवणाऱ्या यंत्रणांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय.

हेही वाचा :

धक्कादायक : 1 लिटर दुधात बादलीभर पाणी, मध्यान्न भोजन म्हणून 81 मुलांना वाटप

मुंबईतील मुलांमध्ये पोषणाची गंभीर समस्या, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल

शिजणाऱ्या पोषण आहारात पडून 6 वर्षांच्या विद्यार्थीनीचा मृत्यू

व्हिडीओ पाहा :

MNS complaint about Mid day meal in Pune to Education Minister Varsha Gaikwad

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.