मुंबईतील मुलांमध्ये पोषणाची गंभीर समस्या, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल

पोषण आहार मिळत नसल्याचा मोठा परिणाम मुंबईच्या मुलांवर दिसत आहे. पोषणाअभावी त्यांचं वजन सामान्यपेक्षा कमी आहे (Malnutrition in Mumbai Children). इतकंच नाही तर त्यांना अनेक प्रकारचे रोग होण्याचाही धोका आहे.

मुंबईतील मुलांमध्ये पोषणाची गंभीर समस्या, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल

मुंबई : पोषण आहार मिळत नसल्याचा मोठा परिणाम मुंबईच्या मुलांवर दिसत आहे. पोषणाअभावी त्यांचं वजन सामान्यपेक्षा कमी आहे (Malnutrition in Mumbai Children). इतकंच नाही तर त्यांना अनेक प्रकारचे रोग होण्याचाही धोका आहे, असा दावा प्रजा फाऊंडेशनच्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. या अहवालानुसार, अंगनवाडीतील 17 टक्के मुलं आणि मुंबई महानगर पालिकेल्या (बीएमसी) शाळेत शिकणाऱ्या 3 टक्के मुलांचं वजन सामान्यपेक्षा कमी आहे (Malnutrition).

प्रजाने (Praja Foundation) या संबंधी आरटीआय दाखल केला होता. त्याअंतर्गत बीएमसी आणि ‘इंटिग्रेटेड चाईल्ड डेव्हलपमेंट सर्विस (ICDS)’कडून देण्यात आलेल्या उत्तरात ही माहिती समोर आली. 2018-19 मध्ये अंगनवाडीच्या 2.86 लाख मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 48,849 म्हणजेच तब्बल 17 टक्के मुलांमध्ये पोषणाची कमतरता दिसून आली. तर बीएमसी शाळेत शिकणारे 2.26 लाख मुलांचीही आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 7,383 मुलांचं वजन त्यांच्या वयानुसार कमी असल्याचं निदर्शनास आलं. जानकारांनुसार, पोषण आहाराच्या कमतरतेमुळे मुलांचं वजनच कमी होत नाही तर त्यांना अनेक प्रकारच्या शारिरीक समस्यांनाही तोंड द्यावं लागतं.

2018-19 मध्ये बीएमसी बजेट दरम्यान आयुक्तांनी बीएमसी शाळेतील मुलांना ‘सप्लीमेंटरी न्यूट्रीशन’ देण्यासाठी 25 कोटी रुपयांची तरतूद केली होती. पण, शाळांमध्ये हे पूरवण्यासाठी बीएमसीला कुणीही ठेकेदार मिळाला नाही. त्यामुळे आतापर्यंत यासाठी एकही रुपया खर्च करण्यात आलेला नाही, असा दावा प्रजाने केला आहे.

‘मुंबईत मुलांमधील पोषणाची कमी एक गंभीर समस्या आहे. गेल्या तीन वर्षांपासून कमी-अधिक प्रमाणात ही समस्या उद्भवते आहे. 2018-19 मध्ये 17 टक्के मुलांचं कमी वजन होतं, तर दोन हजारपेक्षा जास्त मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात कमी वजनाची समस्या दिसून आली’, अशी माहिती प्रजा फाऊंडेशनचे योगेश मिश्र यांनी दिली.

‘पोषण अभावामुळे 2017 मध्ये 32 लोकांचा मृत्यू झाला होता. यांचं वय 0 ते 19 दरम्यान होतं. मात्र, याबाबत कुणालाही गांभिर्य नाही हे विशेष’, असं प्रजा फाउंडेशनचे संस्थापक निताई मेहता यांनी सागितलं.

Published On - 8:27 am, Wed, 6 November 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI