पोलीस, डॉक्टरांसह लष्करी जवान आणि माजी सैनिकांनाही प्राधान्याने कोरोनाची लस द्या, मनसेची मागणी

राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे, की कोरोनाची लस ही सुरुवातीला फक्त डॉक्टर, पोलिस आणि कोरोना सेवकांनाच दिली जाईल. त्यात लष्करी जवान, माजी सैनिक आणि त्यांच्या परिवाराचाही प्रथम श्रेणीत समावेश करुन, त्यांनाही कोरोनाची लस दिली जावी अशी मागणी बाळा नांदगावकर यांच्याकडून करण्यात आली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:19 PM, 2 Dec 2020
MNS will contest BMC election in Mumbai without any alliance Hindutva is our main agenda says bala nandgaonkar

मुंबई: कोरोनाची लस आल्यानंतर ती सुरुवातीला डॉक्टर, पोलिस आणि कोरोना सेवकांनाच दिली जाणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. त्यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी डॉक्टर, पोलिसांसह लष्करातील जवान आणि माजी सैनिक व त्यांच्या परिवाराचं अग्रक्रमाने लसीकरण करण्यात यावं अशी मागणी केली आहे.(MNS leader Bala nandgaonkar on corona vaccine)

कोरोनाची लस आल्यानंतर प्रथम श्रेणीत ती लोकप्रतिनिधींनाही देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे, की कोरोनाची लस ही सुरुवातीला फक्त डॉक्टर, पोलिस आणि कोरोना सेवकांनाच दिली जाईल. त्यात लष्करी जवान, माजी सैनिक आणि त्यांच्या परिवाराचाही प्रथम श्रेणीत समावेश करुन, त्यांनाही कोरोनाची लस दिली जावी अशी मागणी बाळा नांदगावकर यांच्याकडून करण्यात आली आहे. हे सर्वच देशासाठी बलिदान देण्यात अग्रेसर असतात असं नांदगावकर म्हणाले.

पहिली लस कोरोना योद्ध्यांनाच- टोपे

प्रथम श्रेणीत कोरोना लस लोकप्रतिनिधींनाही देण्यात यावी, अशी मागणी काही लोकांकडून होत आहे. त्यावर, अशी कुठलीही मागणी झालेली नाही. लस आल्यानंतर ती पहिल्यांदा डॉक्टर आणि पोलिस कर्मचाऱ्यांनाच देण्यात येईल, असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. कोरोना लस कुणाला द्यावी, त्याचं वर्गिकरण कसं व्हावं याचं संपूर्ण नियंत्रण केंद्र आणि राज्य सरकारकडे आहे. प्रोटोकॉलनुसारच लस देण्यासंदर्भात विचार केला जाईल, असं टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

लोकप्रतिनिधींना अग्रक्रमाणे कोरोना लस द्या- नरेश म्हस्के

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी सर्वच स्तरांतून अथक परिश्रम करण्यात येत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी तसेच आमदार, खासदार यांनीही आपला जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांची अहोरात्र सेवा केली असून, काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. कोरोनाची लस उपलब्ध झाल्यानंतर लसीचा प्राधान्यक्रम ठरविताना आरोग्य कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांसह लोकप्रतिनिधींचा देखील अग्रकमाने समावेश करावा, अशी मागणी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

संबंधित बातम्या:

कोरोना लसीचा प्राधान्यक्रम ठरविताना लोकप्रतिनिधींचा अग्रक्रमाने समावेश करा : नरेश म्हस्के

BREAKING | फायझर-बायोएनटेक कोरोना लसीला मंजुरी देणारा पहिला देश ठरला UK! पुढील आठवड्यापासून वितरण सुरु

कोरोना लस कधी येणार माहिती नाही, पण सरकारकडून नियोजन सुरु- राजेश टोपे

MNS leader Bala nandgaonkar on corona vaccine