AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोमेश्वर कारखान्याच्या २१ जागांसाठी उद्या मतदान; त्याआधी पैशांवरून वाद, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितलं काय घडलं?

Someshwar Sugar Factory Election News: सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत पैसे वाटपाच्या आरोपाने खळबळ उडाली आहे. २ लाख २ हजार ३०० रुपये हस्तगत केल्याचे समोर आले आहे.

सोमेश्वर कारखान्याच्या २१ जागांसाठी उद्या मतदान; त्याआधी पैशांवरून वाद, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितलं काय घडलं?
| Updated on: Oct 10, 2026 | 9:26 PM
Share

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैसे वाटपाच्या आरोपामुळे राजकीय वातावरण तापले आहे. माळेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांवर पैसे वाटप केल्याचा आरोप पुरुषोत्तम जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणात २ लाख २ हजार ३०० रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. परस्पर तक्रारींच्या आधारे पोलीस तपास सुरू असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी दिली.

या घटनेबाबत माहिती देताना आहेर म्हणाले की, सुरुवातीला दोन गटांमध्ये वाद झाला. त्यातील एका गटाने संबंधित रोख रक्कम घेऊन तक्रार केली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलीस आणि आचारसंहिता पथकाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. मात्र काल रात्री घडलेल्या प्रकारात पथकाला सुरुवातीला पैसे हस्तगत करता आले नव्हते. त्यानंतर या प्रकरणात २ लाख २ हजार ३०० रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली.

या प्रकरणात दोन्ही बाजूंनी तक्रारी आणि आरोप करण्यात आले आहेत. पोलीस त्याचा तपास करत आहेत, असे आहेर यांनी स्पष्ट केले. तर दुसरीकडे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात पुणे आणि सातारा जिल्ह्यांचा समावेश आहे. एकूण २७ हजार ७०० मतदार असून, २१ जागांसाठी ८३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदानासाठी ९३ केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे ७५० कर्मचारी तैनात असतील.

सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध झाल्याचेही आहेर यांनी सांगितले. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणी लवकर पूर्ण व्हावी यासाठी ९३ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे संध्याकाळपर्यंत निकाल हाती येतील, अशी व्यवस्था केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी दिली. आता मतदानाच्या दिवशी प्रशासनासमोर शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचे आव्हान असणार आहे.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे