AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईसह राज्यात या दिवशी होणार पावसाला सुरुवात, Monsoon बाबत आली मोठी बातमी

मान्सूनबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे हैराण झालेल्या लोकांना दिलासा कधी मिळणार असा प्रश्न पडला आहे. अशा सगळ्यांना आता हवामान खात्याने गुडन्यूज दिली आहे. राज्यात पाऊस कधीपर्यंत दाखल होणार आहे जाणून घ्या.

मुंबईसह राज्यात या दिवशी होणार पावसाला सुरुवात, Monsoon बाबत आली मोठी बातमी
Rain update 2024
shailesh musale
shailesh musale | Updated on: May 29, 2024 | 4:17 PM
Share

Mansoon Update : उत्तर भारतात गेल्या काही दिवसांपासून उष्णता इतकी वाढली आहे की घराबाहेर पडणं कठीण झाले आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि बिहारसह अनेक राज्यांमध्ये पारा वाढला आहे. उष्णतेचा कहर सुरूच आहे. अनेक शहरांमध्ये तापमान 50 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. पण यादरम्याने एक मोठी गुडन्यूज देखील आली आहे. येत्या २४ तासांत मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होईल, असे हवामान खात्याचे म्हटले आहे. त्यामुळे लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पुढील काही आठवड्यांत मध्य आणि उत्तर भारतालाही उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. बुधवारी हवामान खात्याने अंदाज वर्तवला की, मान्सून केरळकडे सरकत आहे, जो आतापर्यंत मालदीवच्या आसपास होता. तो आता केरळकडे सरकत आहे. त्यानंतर मग तो उत्तर-पूर्व राज्यांकडे सरकणार आहे.

उष्णतेचा तडाखा कमी होणार

उष्णतेच्या लाटेचा सामना करणाऱ्या उत्तर आणि मध्य भारतातील राज्यांसाठीही हवामान खात्याने दिलासादायक बातमी दिली आहे. ३० मेपासून उष्णतेच्या लाटेचा प्रभाव काहीप्रमाणात कमी होण्यास सुरुवात होणार आहे. हवामान खात्याने म्हटले की, पुढील एका आठवड्यात ईशान्येकडील राज्यांमध्ये चांगला पाऊस होईल. त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर, नागालँड, आसाम आणि मेघालयमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. सिक्कीम आणि बंगालमध्येही हवामान बदलणार आहे. या राज्यात पुढील 5 दिवसात पाऊस होण्याची शक्यता आहे.

बंगाल, झारखंड, बिहार व्यतिरिक्त ओडिशामध्ये 31 मे ते 2 जून दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळ येण्याचीही शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीर या राज्यांमध्येही हवामान बदलणार आहे. डोंगराळ भागात हलका पाऊस पडू शकतो.

महाराष्ट्रात कधी येणार मान्सून

मुंबई आणि महाराष्ट्रात देखील लवकरच मान्सून दाखल होणार आहे. त्यामुळे उन्हाच्या तडाख्यापासून नागरिकांची लवकरच सुटका होणार आहे. येत्या 10 किंवा 11 जूनला मान्सून मुंबईत दाखल होणार आहे. त्यानंतर 15 जूनपासून पुढे तो संपूर्ण महाराष्ट्रात पसरणार आहे. हवामान खात्याने या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. यंदा सरासरीपेक्षा 106 टक्के पावसाची शक्यता आहे.

Follow Us
नुसती धावपळ...धुराचा कल्लोळ...आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग!
नुसती धावपळ... धुराचा लोट...आयकर विभागाच्या कार्यालयाला आग! अग्निशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये धवपळ, 13 हुन अधिक...
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मोठी दुर्घटना टळली
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं विधान...
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं अगदी जिव्हारी लागणारं वक्तव्य
राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट
मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट: राज्याच्या विकासासाठी मागितले सहकार्य
रायगडला नवा पालकमंत्री, गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव...
रायगडला नवा पालकमंत्री, गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला,पालकमंत्रीपदी गोगावले, महाजन यांची नियुक्ती
रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले, नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट...
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट याचिकाकर्त्यांनाच नोटीस; ED, CBI...