AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुकाराम मुंढे यांच्या कारवाईने बॉलिवूड भीतीचे वातावरण, शाहरूख-अजय अडकले, अक्षय कुमार वाचला, थेट..

तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध विभागाचा कारभार आपल्या हातात घेतल्यापासून अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच बॉलिवूडच्या प्रसिद्ध कलाकारांना नोटीस पाठवण्यात आल्यात. ज्याने एकच मोठी खळबळ उडाली.

तुकाराम मुंढे यांच्या कारवाईने बॉलिवूड भीतीचे वातावरण, शाहरूख-अजय अडकले, अक्षय कुमार वाचला, थेट..
Tukaram Mundhe and Akshay Kumar
| Updated on: Aug 17, 2026 | 3:20 PM
Share

तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध विभागाचा कारभार आपल्या हातात घेतल्यापासून राज्यभरात मोठ्या कारवाया केल्या जात आहेत. मोठ्या रेस्टारंट आणि हॉटेलवर धाडी टाकल्या जात आहेत. जिथे आपण स्वच्छ आणि चांगले अन्न मिळते म्हणून जात होतो, त्याच ठिकाणी खाणीचे साम्राज्य असल्याचे स्पष्ट झाले. तुकाराम मुंढे कोणाचीही गय करत नाहीत. FDA ने आपला मोर्चा थेट बॉलिवूडकडे वळवला. विमल इलायची उत्पादनाची जाहिरात करणारे बॉलिवूड कलाकार अजय देवगण, शाहरूख खान आणि टायहर श्रॉप यांना थेट कारणे दाखवला नोटीस पाठवण्यात आली. या अभिनेत्यांकडून राज्यात प्रतिबंधित असलेल्या पान मसाल्याची जाहिरात करण्यात आली. सरोगेट जाहिरात केल्याचा संशय एफडीएला आहे. 15 दिवसात अभिनेत्यांना नोटीसला उत्तर द्यायचे आहे. मात्र, या तिन्हा अभिनेत्यांना नोटीस पाठवण्यात आली पण अभिनेता अक्षय कुमार याला नाही, अक्षय कुमार या नोटीसमधून कसा सुटला यावर चर्चा रंगताना दिसतंय.

अभिनेत्यांवर ही जाहिरात केल्याने मोठा दंड लागू शकतो. यासोबतच जाहिरातीवर बंदीही येऊ शकते. 10 लाख रूपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. तुकाराम मुंढे यांच्याकडून गुटखा माफियांविरोधात मोठी कारवाई केली जातंय. विमलच्या जाहिरातीवरून 2022 मध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर अक्षय कुमार याने वेगळी भूमिका घेतली होती. त्याने या जाहिरातीनंतर होणाऱ्या टीकेनंतर जाहिरपणे माफी मागितली.

हेच नाही तर अक्षय कुमार याने ब्रॅंड अॅम्बेसेडर म्हणून माघारही घेतली, तशी अक्षय कुमारने घोषणा केली. जाहिरातीमधून मिळालेले कोट्यावधी दान करणार असल्याचेही त्याने जाहीर केले होते. मात्र, अगोदर झालेल्या करारामुळे काही ठराविक कालावधीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली. जुनी जाहिरात पुढे आल्याने अक्षयने सांगितले की, या जाहिरातीचा आणि आपला काहीही संबंध नाही. म्हणून एफडीएने अक्षय कुमार याला नोटीस पाठवली नाही.

अक्षय कुमार या नोटीसमधून वाचला आहे. आता हे अभिनेते एफडीएच्या कारवाईवर नक्की काय उत्तर देतात, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. कारण  हा मोठा दणका बॉलिवूड कलाकारांना तुकाराम मुंढे यांच्याकडून म्हणावा लागणार आहे. त्यांनी थेट या कलाकारांना नोटीस पाठवल्या आहेत.

Follow Us
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणात नवा ट्वीस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरेंचं नाव नाहीच...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णयाक सुनावणी... शिंदेंचे वकिल करणार युक्तिवाद
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?