Vinayak Mete : आईची सेवाही राहिली अधुरी, अपघाताच्या पूर्वसंध्येलाच मेटेंनी काय दिले होते आईला आश्वासन..?

विनायक मेटे यांचे मूळ गाव हे राजेगाव आहे. ते गेल्या काही वर्षापासून बीडमध्ये वास्तव्यास होते तर त्यांच्या आई ह्या राजेगावात. मात्र, आईची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या मेटेंनी आईला बीड येण्याचा आग्रही केला होता. मात्र, सध्याचे कार्यक्रम आणि सणसूद उरकून पुन्हा येते असे त्यांच्या आईने सांगितले होते.

Vinayak Mete : आईची सेवाही राहिली अधुरी, अपघाताच्या पूर्वसंध्येलाच मेटेंनी काय दिले होते आईला आश्वासन..?
विनायक मेटे यांच्या आठवणींना त्यांच्या आईंनी दिला उजाळा
Follow us
| Updated on: Aug 14, 2022 | 5:15 PM

बीड :  (Vinayak Mete) विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर आता त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. कार्यकर्ते त्यांच्यासोबतचा किस्सा शेअर करीत आहेत तर कुटुंबातील सदस्यही त्यांच्या सहवासातील आठवणी सांगत आपल्या भावना व्यक्त करीत आहेत. मात्र, आई बरोबर मेटे यांचे निराळेच नाते होते. राज्यभर साहेब असलेले मेटे घरी मात्र, सर्वांसाठी बप्पा होते. त्यांच्या आईंनीही वेगवेगळ्या आठवणींना उजाळा दिलेला आहे. मेटे यांच्या आई ह्या त्यांच्या मूळगावी म्हणजेच राजेगाव येथे राहत होत्या तर विनायक मेटे हे (Beed) बीडमध्ये. मात्र, वेळात वेळ काढून ते आईची विचारपूस करण्यासाठी गावी येत होते. आईच्या पायाला सूज असल्याने (Treatment at the hospital) दवाखान्यात उपचार घ्यायचे होते. पण मुंबईची काम उरकून पुन्हा चांगल्या दवाखान्यात दाखवू असे म्हणत गेलेले विनायक मेटे हे परतलेच नाही. आता उद्या त्यांचे पार्थिवच बीडला येत आहे यापेक्षा वेगळ्या वेदना एखाद्या माऊलीला काय असणार..!

बीडला येण्याचाही केला आग्रह

विनायक मेटे यांचे मूळ गाव हे राजेगाव आहे. ते गेल्या काही वर्षापासून बीडमध्ये वास्तव्यास होते तर त्यांच्या आई ह्या राजेगावात. मात्र, आईची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या मेटेंनी आईला बीड येण्याचा आग्रही केला होता. मात्र, सध्याचे कार्यक्रम आणि सणसूद उरकून पुन्हा येते असे त्यांच्या आईने सांगितले होते. एवढेच नाहीतर आईचे पाय दुखत असतात याची माहिती त्यांना असल्याने दवाखान्यात घेऊन जाण्याबद्दलही त्यांनी आईला अश्वासन दिले होते.

येतो म्हणलेले मेटे परतलेच नाहीत

विनायक मेटे यांना रविवारच्या बैठकीसाठी मुंबईला जायचे होते. तत्पूर्वी त्यांनी राजेगावला जाऊन आईच्या तब्येतेची विचारपूस केली. एवढेच नाहीतर 22 ऑगस्टला परत येण्याचे आश्वासन त्यांनी आईला दिले होते. मात्र, मुंबईकडे रवाना होत असतानाच वाटेतच त्यांचे अपघाती निधन झाले आहे. त्यामुळे आईला दवाखान्यात दाखवायचेही अपूर्ण राहिले आणि 22 ऑगस्टला परत येणारे मेटे आता कधीच परत येऊ शकणार नाहीत हे दुख ते वेगळेच.

रात्री 11:30 वाजता बीडमधून रवाना

रविवारी दुपारी 12 वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मराठा आरक्षणाबाबत मुंबई येथे बैठक असल्याने मेटे सुरक्षा रक्षक आणि त्यांच्या गाडीचा चालक हे बीडहून रात्री 11:30 च्या दरम्यान मुंबईकडे रवाना झाले होते. मात्र, आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवेवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ हा अपघात झाला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर आता चौकशीची मागणीही समोर येऊ लागली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.