AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्याख्यानाला पुण्यात विरोध होताच अमोल कोल्हे यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, राजकीय..

शिवरायांच्या इतिहासाचा अभ्यास असणारे अभिनेते खासदार अमोल कोल्हे यांच्या व्याखानाला पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवला. आता हा वाद चिघळत असतानाच अमोल कोल्हे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

व्याख्यानाला पुण्यात विरोध होताच अमोल कोल्हे यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, राजकीय..
Amol Kolhe
| Updated on: Feb 20, 2026 | 11:43 AM
Share

शिवछत्रपतींची भूमिका साकारलेले, शिवरायांच्या इतिहासाचा अभ्यास असणारे, अभिनेते खासदार अमोल कोल्हे यांच्या व्याखानाला पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवला आहे. त्यासंबंधी विद्यार्थ्यांनी आपल्या सह्यांचे पत्र विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिले आहे. या कार्यक्रमाला राजकीय स्वरूप येईल, असा त्यांचा आक्षेप आहे. दुसरीकडे कोल्हे यांच्या समर्थनार्थ काही विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना पत्र लिहिले आहे. शिवजयंतीनिमित्त होणाऱ्या अमोल कोल्हे यांच्या व्याख्यानाला विरोध झाल्यामुळे पुण्यात वादाची ठिणगी पडली आहे. आता हा वाद चांगलाच वाढताना दिसत आहे. यावर आता अमोल कोल्हे यांनीही थेट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपली बाजू मांडली असून नक्की काय घडले याबद्दल स्पष्ट बोलताना अमोल कोल्हे दिसले आहेत.

अमोल कोल्हे यांनी म्हटले की, सावित्रीबाई फुले विद्यापीठाने मला ऑफिसियल मेल पाठवून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर व्याख्यान देण्यासाठी बोलावले होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधणे व त्यांना महाराजांचा इतिहास सांगणे आनंदाची गोष्ट असून राजकीय जोडे बाजूला ठेऊन हे काम मी करतो. पण विद्यार्थ्यांच्या एका मोठ्या गटाने राजकीय पार्श्वभूमी नको म्हणून माझ्या व्याख्यानाला विरोध केल्याचं माध्यमांमधून समजलं आहे.

त्या उलट विद्यार्थ्यांच्या एका मोठ्या गटाने हे व्याख्यान व्हावे अशी भूमिका घेतली आहे. विद्यापीठाकडून अजून तसे काही स्पष्टीकरण आलेलं नाही, त्यांची अधिकृत भूमिका माझ्यापर्यंत पोहोचली नाही, छत्रपती शिवाजी महाराज सांगणे हे माझं कर्तव्य व ते मी बजावणार. असं स्पष्ट मत खासदार अमोल कोल्हे यांनी पुणे विद्यापीठातील व्याख्यानाच्या विरोधाच्या मुद्द्यावर बोलताना व्यक्त केलंय.

पुण्यातील साळवे गार्डन या ठिकाणी असलेला कार्यक्रम हिंदुत्ववादी संघटनेने बंद पाडण्याचा प्रयत्न केला. हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. इतिहास तज्ञ श्रीमंत कोकाटे यांच्या भाषणाला समस्त हिंदू आघाडीचा विरोध. पुणे कोर्टात बार असोसिएशनने ठेवले होत शिवजयंती निमित्त व्याख्यान. कोर्टाच्या गेटवर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केल आंदोलन. आता पर्यंत श्रीमंत कोकाटे यांनी समर्थ रामदास इतर देवतांवर बोलले आहेत, त्याचा निषेध म्हणून केल होत आंदोलन

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...