AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार यांची अतीघाई, वेळेपूर्वीच उद्घाटन, भाजप खासदाराच्या नाराजीनंतर पुन्हा…

माझी दादांना विनंती आहे. रात्रीची किंवा दिवसाची कुठली ही वेळ द्या. पण एक वेळ घोषित करा. प्रोटोकॉल नुसार ज्यांना, ज्यांना आमंत्रण दिले ते सर्व येणार असतात. यामुळे वेळेआधीच उद्घाटन करु नये. आपण कधी रेल्वे, बस किंवा फ्लाईट पकडण्यासाठी वेळेवर जातो. परंतु वेळेपूर्वीच ते निघून गेल्यावर वाईट वाटते. तसा हा प्रकार आहे.

अजित पवार यांची अतीघाई, वेळेपूर्वीच उद्घाटन, भाजप खासदाराच्या नाराजीनंतर पुन्हा...
मेधा कुळकर्णी नाराज.
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 01, 2025 | 11:42 AM
Share

सकाळी लवकर उठून कार्यक्रमांना सुरुवात करण्याची सवय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आहे. परंतु गुरुवारी कार्यक्रमाच्या ठरलेल्या वेळेपूर्वीच अजित पवार यांनी उद्घाटन केले. त्यासाठी कार्यक्रमाचे आमंत्रण दिलेल्या भाजप खासदार येण्याची वाट त्यांनी पाहिली नाही. त्यामुळे भाजप खासदाराने जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली. आम्हालाही पहाटे उठायची सवय आहे, पण नियोजित वेळेआधी उद्घाटन होवू नये, ही दादांना विनंती आहे, असे भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी म्हटले. त्यामुळे दुसऱ्यांदा अजित पवार यांना उद्घघाटन करावे लागले.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याची पालकमंत्री अजित पवार हे सकाळी लवकर उठतात आणि लवकर कार्यक्रम सुरु करतात. त्यांची ही सवय सर्वांना माहीत आहे. गुरुवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या आधीच त्यांनी कामाला सुरूवात केली. मात्र, कार्यक्रमांची वेळ ही सकाळी 6.30 ठरवलेली होती. त्यापूर्वीच त्यांनी पुणे येथे परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले. या कार्यक्रमास भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनाही बोलवण्यात आले होते. परंतु त्यांची वाट न पाहता उद्घाटन झाल्याने त्यांची थोडी चीड चिड झाली. त्यामुळे अजित पवार यांनी लवकर उद्घाटन केल्याबद्दल माफी मागतो, असे सांगत पुन्हा एकदा उद्घाटन केले.

काय म्हणाल्या मेधा कुलकर्णी?

खासदार मेधा कुलकर्णी यांनी सांगितले की, अजित पवार यांच्या कामाची पद्धत मला आवडते. आम्हालाही पहाटे उठायची सवय आहे. मात्र, नियोजित वेळेआधी उद्घाटन होवू नये, ही दादांना विनंती आहे. मी नियोजित वेळेपूर्वीच कार्यक्रमस्थळी पोहोचले होते. मात्र त्या आधीच उद्घाटन झाले होते. दहा मिनिटे आधी उद्घाटन झाले होते, अशी खंत मेधा कुलकर्णी यांनी बोलून दाखवली.

मेधा कुलकर्णी पुढे म्हणाल्या की, माझी दादांना विनंती आहे. रात्रीची किंवा दिवसाची कुठली ही वेळ द्या. पण एक वेळ घोषित करा. प्रोटोकॉल नुसार ज्यांना, ज्यांना आमंत्रण दिले ते सर्व येणार असतात. यामुळे वेळेआधीच उद्घाटन करु नये. आपण कधी रेल्वे, बस किंवा फ्लाईट पकडण्यासाठी वेळेवर जातो. परंतु वेळेपूर्वीच ते निघून गेल्यावर वाईट वाटते. तसा हा प्रकार आहे. पुण्यात मी एकच ब्राम्हण खासदार आहे. परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठी मी नक्की काम करेल.

परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नवीन इमारतीचे उद्घाटनानंतर पुण्यातील सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत या उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना