BJP प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठेंना न्यायमुर्ती बनवण्यावर संजय राऊत यांनी मांडलं रोखठोक मत
"मुंबई महाराष्ट्रातले विषय चर्चेने सोडवू. आमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये तेवढी क्षमता आहे. त्यासाठी दिल्लीत येऊन इंडिया ब्लॉगमध्ये चर्चा करण्यची आवश्यकता नाही" असं राऊत म्हणाले.

भाजपच्या प्रवक्त्या आरती साठे यांची न्यायमुर्तीपदी नियुक्ती करण्यात आली त्यावर संजय राऊत यांनी आक्षेप नोंदवला. “भारतीय न्यायव्यवस्थेचा दशावतार, दुर्देव याला म्हणतात. पक्ष कोणताही असेल, भाजपच्या काळात जे प्रवक्ते राहिलेले आहेत, ज्यांनी भाजप विरोधकांवर कठोर शब्दात टीका केली आहे. मोदी-शाहंच्या चुकीच्या भूमिकाचं समर्थन केलेलं आहे. अशी व्यक्ती ती कोणी ही असेल, तिला मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तीपदावर नेमणं हे मुंबई उच्च न्यायालयाच्या महान परंपरेला कंलकीत करणारं आहे” असं संजय राऊत म्हणाले.
“माझा कोणावरही व्यक्तीगत आकस नाहीय. भाजप सत्तेत आल्यापासून तामिळनाडूच्या चेन्नई कोर्टात भाजपच्या प्रवक्त्या राहिलेल्या महिलेला हायकोर्टाच्या न्यायमुर्तीपदी नेमलं. आता मुंबईत हायकोर्टातही तेच. एखाद्या पक्षाचा प्रवक्ता त्या विचारधारेला बांधील असतो. एकदाचा प्रवक्ता हा कायमचा प्रवक्ता असतो. मुंबई हायकोर्टात भाजपशी संबंधित पाच न्यायमुर्ती आहेत. जे कधी संघ परिवाराच्या शाखेत जात होते, कुटुंब संघ परिवाराशी संबंधित आहे, असे पाच ते सहा न्यायमुर्ती आहेत. सुप्रीम कोर्टात नेमणूक घडवून देशाची न्याययंत्रणा ताब्यात ठेवण्याच मोदी-शाह यांच्या भाजपच कारस्थान आहे” असा आरोप संजय राऊत यांनी केला.
राज्याच्या लोकशाहीसाठी घातक
“या देशातील सर्व घटनात्मक संस्था आपल्या गुलाम असाव्यात, यासाठी निवडणूक आयोगापासून राज्यपालांपर्यंत आज फक्त भाजपचे लोक नेमले जात आहेत. हे राज्याच्या लोकशाहीसाठी घातक आहे” असं राऊत यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा किती दिवसांचा?
“उद्धव ठाकरे मुंबईतून इथे दोन-तीन दिवसासाठी येत आहेत. राहुल गांधींसोबत त्यांची बैठक आहे. इंडिया आघाडीची बैठक आहे. महत्वाच्या विषयावर चर्चा होईल. आज संध्याकाळी इथे शिवसेना खासदाराची बैठक होईल. कदाचित आज ते संध्याकाळी शरद पवारांना भेटण्याची शक्यता आहे” असं संजय राऊत यांनी सांगितलं.
ठाकरे गट आणि मनसेच्या युतीवर काँग्रेस नाराज का?
ठाकरे गट आणि मनसेच्या युतीवर काँग्रेस नाराज आहे, या प्रश्नावर सुद्धा संजय राऊत यांनी उत्तर दिलं. “अजिबात नाही हे मुंबईचे विषय दिल्लीत आणण्याचं कारण नाही.
