Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होळीला परवानगी नाही, गणेशोत्सवात पीओपी मुर्तींवर बंदी, हे कसलं हिंदुत्व? संजय राऊतांचा हल्लाबोल

"गणेशोत्सव, दिवाळीत फटाक्यांवर बंदी आणता. पर्यावरणाची इतकी काळजी आहे, मग गढूळ पाण्यात महाकुभंमध्ये का स्नान करायला लावलं?. राष्ट्रीय हरीत लवादाचा रिपोर्ट असताना सुद्धा त्या गटारगंगेत कोट्यवधी लोकांना का डुबकी मारायला लावली?" असे प्रश्न संजय राऊत यांनी विचारले आहेत.

होळीला परवानगी नाही, गणेशोत्सवात पीओपी मुर्तींवर बंदी, हे कसलं हिंदुत्व? संजय राऊतांचा हल्लाबोल
संजय राऊत Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 13, 2025 | 10:42 AM

“9 लाख 32 हजार कोटींच महाराष्ट्रावर कर्ज आहे. आता कर्ज काढून राज्य चालवल जातय. राज्य़ लुटल जातय. राज्यावरच कर्जाच ओझ दिवसेंदिवस वाढतय हे माहित असताना सुद्धा लाडक्या बहिणी सारख्या योजना आणल्या आणि आता त्या बंद करायच्या मार्गावर आहेत. शिवभोजन थाळी सारख्या गरीबांच्या योजना, शिधा योजना अशा अनेक योजना बंद केल्या. आता लाडकी बहिण योजना सुद्धा बंद करतील” असा दावा खासदार संजय. राऊत यांनी केला. “हे राज्य कसं चालवणार हा प्रश्न आहे. कर्ज काढून दिवाळी साजरी करणं किंवा निवडणुकीत मत विकत घेणं हा म्हणजे कर्जबाजारी महाराष्ट्राची तिजोरी या लोकांनी महिलांची मत विकत घेण्यासाठी वापरली” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

“जाहीरनाम्यात त्यांच्या दोन प्रमुख घोषणा आहेत, लाडक्या बहिणींना 2100 रुपये आणि शेतकऱ्यांना कर्ज माफी या घोषणा आहेत. त्याचं तुम्ही काय करणार याचं उत्तर राज्याच्या जनतेला मिळालं पाहिजे. आठ लाख हजार कोटीच्या वरच कर्ज हा कर्जाचा डोंगर तुम्ही कसा कमी करणार आहात?” असा सवला संजय राऊत यांनी विचारला. “शक्तीपीठ मार्गाची मागणी कोणी केली होती?. शक्तीपीठ मार्गाची मागणी गेल्या काही वर्षात ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले गेले. त्यांच्याकडून हजारो कोटी रुपये आधीच काढून घेतले. टेंडर देण्यात आले. ते पैसे निवडणुकीचत वापरले असतील किंवा आमदार खरेदीसाठी वापरले असावेत” असं संजय राऊत म्हणाले.

‘हे 100 शेतकरी जे आहेत, ते भाजपचे एजंट असावेत’

“शक्तीपीठ मार्गासाठी शेतकरी भूमी अधिग्रहण करण्याच्या विरोधात आहे” असं संजय राऊत म्हणाले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शक्तीपीठ मार्गासाठी 100 शेतकरी त्यांना भेटले. यावर संजय राऊत म्हणाले की, “हे 100 शेतकरी जे आहेत, ते भाजपचे एजंट असावेत. त्यांच्या माध्यमातून जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार सुरु असावेतय. सामान्य शेतकऱ्यांना आपली जमीन द्यायची नाहीय. मूळात शक्तीपीठ महामार्गाची गरज काय? असा प्रश्न सगळे विचारतायत. शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. तुमच्याकडे 100 शेतकरी आले म्हणून चुकीच्या योजनेच समर्थन होऊ शकत नाही. हा महामार्ग का गरजेचा आहे? हे तुम्ही महाराष्ट्राला पटवून द्या. तुम्हाला तुमच्या मर्जीतल्या ठकेदारांना मालामाल करुन त्या पैशातून निवडणुका लढवायच्यात म्हणून शक्तीपीठ महामार्ग हवा का?” असा सवाल संजय राऊत यांनी केला.

‘बलूचिस्तान हा पाकिस्तानचा अंतर्गत विषय’

बलूचिस्तान ट्रेन अपहरणात भारताचा हात असल्याचा आरोप पाकिस्तान करतोय, त्यावर सुद्धा संजय राऊत बोलले. “एवढा मोठ्या कांडात भारताचा हात असता, तर महाराष्ट्र, देशात अनेक प्रकरण सहज सोडवली असतील. एवढ धाडस असतं, तर चीनने ताब्यात घेतलेली 4 हजार वर्ग किमी जमीन सोडवली असती, अरुणाचलमधून चीनला हुस्कावल असतं. बलूचिस्तान हा पाकिस्तानचा अंतर्गत विषय आहे” असं संजय राऊत म्हणाले.

 ‘हे कसलं हिंदुत्व ?’

“वरळीत होळीला परवानगी मिळत नाहीय. त्यानंतर उद्या गणेशोत्सव येणार आहे. पीओपीच्या मुर्तींवरती बंदी आणलेली आहे, हे कसलं हिंदुत्व ?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. “वर्षातून एकदा येणाऱ्या सणावर तुम्ही बंधन आणताय. आमच्या राज्यात हिंदुंचे सण खुल्या वातावरणात होतील सांगता होता, मग आता काय झालं? असं संजय राऊत म्हणाले.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.