AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुष्काळाबाबत शरद पवारांची मोठी घोषणा, पुढच्या तीन दिवसांत राज्यभर…राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा?

ष्ट्रवादी (पवार गट) पक्षाची एक बैठक पार पडली. या बैठकीत सध्या राज्यातील स्थिती तसेच दुष्काळ निवारणासाठी काय काय करता येईल, यावर चर्चा झाली. याच बैठकीत उपस्थितांना पवार यांनी संबोधित केले. ही बैठक घेण्याआधी पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही एक पत्र लिहिले.

दुष्काळाबाबत शरद पवारांची मोठी घोषणा, पुढच्या तीन दिवसांत राज्यभर...राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा?
sharad pawar on droughtImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 28, 2026 | 1:51 PM
Share

सध्या राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. राज्य सरकारने एकूण 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आलाय. ढोबळपणे सांगायचे झाल्यास संपूर्ण महाराष्ट्र राज्यापैकी एकूण 75 टक्के भागात हा दुष्काळ आहे. या दुष्काळाची सर्वाधिक झळ मराठवाड्याला बसतेय. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर आता शेतकरी, कष्टकरी, कामगारांना वेगवेगळ्या सवलती सरकारने जाहीर केल्यायत. परंतु सरकारने केलेल्या घोषणा पोकळ असून शेतकऱ्यांना तत्काळ मदत हवी आहे, अशी मागणी विरोधकांकडून केली जातेय. तसेच ही मदत अपुरी असल्याचाही दावा विरोधक करतायत. दरम्यान, आता खासदार शरद पवार यांनीही सध्याच्या दुष्काळ परिस्थितीवर महत्त्वाचे भाष्य केलेय. सरकारने जाहीर केलेल्या तरतुदी या अपुऱ्या आहेत. सरकारने नवे निर्णय घ्यावेत अशी मोठी आणि थेट मागणी त्यांनी केलीय.

राष्ट्रवादी (पवार गट) पक्षाची एक बैठक पार पडली. या बैठकीत सध्या राज्यातील स्थिती तसेच दुष्काळ निवारणासाठी काय काय करता येईल, यावर चर्चा झाली. याच बैठकीत उपस्थितांना पवार यांनी संबोधित केले. ही बैठक घेण्याआधी पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही एक पत्र लिहिले. आपल्या या पत्रात त्यांनी सरकारकडे एकूण 17 उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी केलीय. त्यानंतर आता आजच्या बैठकीत त्यांनी सरकार दुष्काळ निवारणासाठी तसेच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कसे अपुरे पडतेय? याबाबत त्यांनी माहिती दिली. सरकारने जारी केलेली मदत ही अपुरी आहे. यातून शेतकऱ्यांना फायदा मिळणार नाही. सध्या शेतकरी संकटात आहे. त्याला भक्कम साथ हवी आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना एक नवा प्रस्ताव पाठवला आहे. त्यात शेतकऱ्यांसाठी काय काय करता येईल, याबाबत सांगण्यात आलंय. आता सरकार नवे निर्णय गेईल अशी अपेक्षा आहे. शेतकरी संकटात आहे, असं मत पवार यांनी व्यक्त केलंय.

तसेच राज्यातील दुष्काळ परिस्थिती गंभीर आहे. शेतकऱ्यांना साथ देणं गरजेचं आहे.  आमच्या पक्षाचे नेते पुढील तीन दिवस राज्याचा दौरा करणार आहेत. शेतीचे किती नुकसान झालेले आहे, याची नेते पाहणी करतील, अशी घोषणाही त्यांनी केली.

Follow Us
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल