AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी जावई, मुलगी आणि व्याहीसोबत पंतप्रधानांची भेट, नंतर केंद्र सरकारवर जोरदार हल्ला; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकताच सरकारवर जोरदार टीका केली. यादरम्यान त्यांनी पेट्रोल डिझेल मुद्द्यात देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्या विधानाकडे लक्ष वेधले. सहकुटुंब सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली.

आधी जावई, मुलगी आणि व्याहीसोबत पंतप्रधानांची भेट, नंतर केंद्र सरकारवर जोरदार हल्ला; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
Supriya sule
| Updated on: May 25, 2026 | 12:11 PM
Share

सुप्रिया सुळे यांनी नुकताच सरकारवर जोरदार टीका केली. सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, पेट्रोल डिझेलच्या दरवाढीबाबत काही आश्वर्य वाटत नाही. ही फक्त सुरूवात आहे, पिक्चर अभी बाकी है.. कशाचेही सोंग घेता येते हो.. पण पैसे आणि अन्नधान्याचे सोंग घेता येत नाही. मुंबईमध्ये पेट्रोल पंप बंद पडत असल्याच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी म्हटले की, मला अजिबातच आश्चर्य वाटत नाही. मागच्याच आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांचे वेगवेगळी विधाने आहेत. फडणवीस यांनी म्हटले की, काही काळजी करू नका.. आपल्याकडे पेट्रोल डिझेल आहे, आम्ही विश्वास ठेवला. भुजबळ म्हणाले की, 30 दिवसाचा साठा आहे, काटकसरीपणे वापरा. याचा काय अर्थ काढायचा. काय नियोजन केले? राहुल गांधी गेल्या सहा महिन्यांपासून ही गोष्टी मांडत आहेत. काय करतंय सरकार? याबाबतीत सरकार का खरे बोलत नाही.

महागाई, भ्रष्टाचार आणि बेरोजगारी याबाबत आम्ही सविस्तर चर्चा करणार आहोत. इलेक्शन काय येतील आणि जातील. पण जो सामान्य माणूस आहे, जो टॅक्स भरत आहे, त्याने कसे जगाचे? घरी जाऊन भाज्यांचे भाव विचारा.. एकीकडे कांद्याला भाव शेतकऱ्यांना मिळत नाही आणि जो ग्राहक आहे, त्याला तो परवडत नाही. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली.

पुढे सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, लोकशाही आणि दडपशाही आम्ही दडपशाहीबद्दल बोलणारे लोक. कोणी राजकारणात यायचे की नाही हा त्यांचा प्रश्न आहे त्यांचा गट ठरवेल की काय करायचे आहे आणि काय नाहीए कोणी कोणत्या निवडणुकीत उतरायचे हे त्यांनी ठरवायचे आहे. निलेश लंके हे केंद्रात कांदा प्रश्नावर लढत आहे. मंत्री आहेत पण ते कांदा प्रश्नावर बोलत नाही. शेतकरी यांना न्याय मिळाला पाहिजे.

दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट सुप्रिया सुळे यांनी घेतली. सहपरिवार त्या नरेंद्र मोदी यांच्या भेटीकरिता पोहोचल्या होत्या. मुलगी रेवतीच्या लग्नाचे निमंत्रण देण्याकरिता त्या पोहोचल्या होत्या. यादरम्यान त्यांच्यासोबत मुलगी रेवती, जावई सारंग लखानी, अरूण लखानी आणि त्यांचे कुटुंब देखील उपस्थित होते. हा विवाहसोहळा मुंबईतच पार पडणार आहे. सुप्रिया सुळे यांचे होणारे जावई सारंग लखानी हे उद्योजक घराण्याशी संबंधित आहेत.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ