AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आम्ही ‘ती’ परीक्षा घेतलीच नाही; MPSC आयोगाकडून अखेर वस्तुस्थिती स्पष्ट, स्पष्टीकरणात काय लिहिलं?

MPSC Clarification On Exam: कामगार आयुक्तालय निरीक्षक परीक्षेतील गैरप्रकार प्रकरणाच्या आरोपावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पष्टीकरण दिली आहे. या प्रकरणी खुलासा करण्यात आला आहे.

आम्ही 'ती' परीक्षा घेतलीच नाही; MPSC आयोगाकडून अखेर वस्तुस्थिती स्पष्ट, स्पष्टीकरणात काय लिहिलं?
| Updated on: Oct 15, 2026 | 5:26 PM
Share

महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागांतर्गत कामगार आयुक्तालयातील निरीक्षक गट-क सरळसेवा पदाकरिता दिनांक २९ व ३० जुलै २०२६ रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला होता. यावर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. परीक्षा घेण्यात आली नसल्याची माहिती आयोगाने दिली आहे.

हा विषय समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यावर तातडीने अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, ही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली नाही. यामुळे या परीक्षेच्या आयोजनाशी आयोगाचा कोणताही संबंध नसून सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या दाव्यांबाबत प्रशासनाने ही महत्त्वाची वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे.

कामगार विभागांतर्गत कामगार आयुक्तालयातील निरीक्षक गट-क सरळसेवा पद परीक्षा घेतलीच नाही, असं आयोगाकडून सांगण्यात आले आहे. उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी आरोप केले होते. यावर एमपीएससी प्रशासनाने लेखी खुलासा केला आहे. या लेखी स्पष्टीकरणात सांगण्यात आले आहे की, राज्य शासनाच्या कामगार विभागाअंतर्गत कामगार आयुक्तालयाच्या निरीक्षक गट-क सरळसेवा पदाकरिता दिनांक २९ व ३० जुलै, २०२६ रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचे सन्माननीय लोकप्रतिनिधी सुषमा अंधारे यांनी जान दिनांक १५ ऑक्टोबर, २०२६ रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये नमूद केल्याची बाब समाजमाध्यमांवर प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

यावर आयोगाकडून स्पष्ट करण्यात येते की, उपरोक्त परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेली नाही. या खुलाशानंतर आता चर्चांना पूर्णविराम लागला आहे. तसेच सुषमा अंधारेंनी केलेले आरोप आयोगाने फेटाळून लावले आहेत. यावर आता सुषमा अंधारे काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पेपरफुटी आणि आंदोलनाच्या मुद्द्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोग चर्चेत आले होते. यानंतर आयोगावर मोठ्या प्रमाणात टीका आणि आरोप झाले आहेत. यानंतर आयोगाकडून आलेले हे स्पष्टीकरण चर्चेत आले आहे.

Follow Us
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?