MPSC पेपर फुटीच्या मुद्यावर मनसेने विचारला एकदम रास्त, पटण्यासारखा प्रश्न, विद्यार्थी भेटले राज ठाकरेंना

MPSC औषध निरीक्षक भरती परीक्षेत पेपर फुटल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. या संदर्भात विद्यार्थ्यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मनसेने एकदम रास्त, पटण्यासारखा प्रश्न विचारला.

MPSC पेपर फुटीच्या मुद्यावर मनसेने विचारला एकदम रास्त, पटण्यासारखा प्रश्न, विद्यार्थी भेटले राज ठाकरेंना
Sandeep Deshpande
| Updated on: Aug 25, 2026 | 12:33 PM

MPSC औषध निरीक्षक भरती परीक्षा पेपर फुटी प्रकरणात विद्यार्थ्यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे या मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. “Mpsc ने ड्रग इन्स्पेकटरसाठी परीक्षा घेतली होती. 40 हजाराहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तेव्हा दोन दिवस आधी पेपर फुटले . त्यानंतर पोलिस यात तपास करत होते. स्पष्ट पुरावे देऊन सुद्धा fir झाला नाही. शासन कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. भाजप आणि त्यांचे कोणी चिल्लेपिले यात सहभागी आहेत का?” असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला. “भाजपचे कोण चिल्ले, पिल्ले बगलबच्चे यात गुंतले आहेत का? याचा तपास केला पाहिजे. न्याय मिळवण्यासाठी म्हणून ते राज साहेबांना भेटले. साहेबांनी त्यांच्याकडून माहिती घेतली. ते आता मुख्यमंत्र्यांसोबत या मुद्यावर बोलतील” असं संदीप देशपांडे म्हणाले.

“आता काय दिलं म्हणजे गुन्हा दाखल करणार? आम्ही आंदोलन केलं की काही बघत नाही थेट एफआयआर दाखल करता. मग, आता एफआयआर दाखल करुन चौकशी का करत नाही?” असा रास्त सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी विचारला. रेशीम बागेत बसून जेन झीं बरोबर गप्पा मारायच्या. पण पेपर फुटीवर मात्र बोलायचं नाही. आपण राम मंदिर आंदोलनाच्यावेळी कसं पोहोचलो ते सांगायचं. त्याने जेन झी येणार नाही. पेपर फुटी मूळ समस्या आहे, त्यावर बोला” असं मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले.

..तर मनसे त्यांच्यामागे आहे

अमराठी रिक्षा चालकांच्या दादागिरीच्या प्रश्नावर संदीप देशपांडे यांनी बोलणं टाळलं. आज MPSC चा विषय आहे, त्यावर बोलू. रिक्षा चालकांच्या विषयावर संजय नाईक बोलतील असं उत्तर संदीप देशपांडे यांनी दिलं. “आज सगळी मराठी माणसं त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी म्हणून राज ठाकरेंकडे येत असतात. आम्ही आमच्यापरीने शक्य होईल तशी मदत त्यांना करतो” असं संदीप देशपांडे म्हणाले. “राजसाहेब MPSC च्या मुलांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांशी बोलतील. मनसे ठामपणे तुमच्यामागे उभी आहे. उद्या निर्णय झाला नाही, या मुलांनी आंदोलनाचा निर्णय घेतला, तर मनसे त्यांच्यामागे आहे” असं संदीप देशपांडे यांनी जाहीर केलं.

Follow Us