MPSC परीक्षांबाबत अत्यंत महत्वाचा निर्णय; अ आणि ब गट पदांची संयुक्त पुर्व परीक्षा एकत्रित होणार

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) परीक्षांबाबत एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. अ आणि ब गटातील पदांची संयुक्त पुर्व परीक्षा एकत्रित होणार होणार असल्याची घोषणा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केली आहे. एकूण आठ पदांसाठी ही एकत्रित परीक्षा होणार आहे. 2023 पासून परीक्षांसाठी हा बदल लागू केला जाणार आहे. या निर्णायमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगावरील ताण कमी […]

MPSC परीक्षांबाबत अत्यंत महत्वाचा निर्णय; अ आणि ब गट पदांची संयुक्त पुर्व परीक्षा एकत्रित होणार
MPSCImage Credit source: MPSC
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 7:55 PM

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) परीक्षांबाबत एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. अ आणि ब गटातील पदांची संयुक्त पुर्व परीक्षा एकत्रित होणार होणार असल्याची घोषणा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केली आहे. एकूण आठ पदांसाठी ही एकत्रित परीक्षा होणार आहे. 2023 पासून परीक्षांसाठी हा बदल लागू केला जाणार आहे. या निर्णायमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगावरील ताण कमी होणार आहे. दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पेपर फुटी रोखण्यासाठी सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांच्या माध्यमातून परीक्षेवर देखरेख ठेवण्याचा निर्णय घेतलाय. संयुक्त पुर्व परीक्षा नावानं वेगळी परीक्षा पद्धती तयार केली जाणार आहे.

म्हणून अ आणि ब गट पदांची संयुक्त पुर्व परीक्षा एकत्रित होणार

कोरोना काळात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा लांबणीवर पडल्या. यामुळे MPSC परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. परीक्षांची वाढती संख्या यामुळे आयोगावर येणारा परीक्षांचा ताण विचारात घेता अ आणि ब गट पदांची संयुक्त पुर्व परीक्षा एकत्रित घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

2023 पासून परीक्षांसाठी हा बदल लागू होणार

अ आणि ब गट पदांची संयुक्त पुर्व परीक्षा एकत्रित घेतली जाणार आहे. 2023 पासून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी हा बदल लागू केला जाणार आहे. यासाठी अराजपत्रित संयुक्त पुर्व परीक्षा नावानं वेगळी परीक्षा पद्धती तयार केली जाणार आहे. 8 पदांसाठी ही परीक्षा एकत्रितच होणार आहे. मुख्य परीक्षा मात्र वेगवेगळ्या संवर्गांनुसार घेतल्या जाणार आहेत.

पीएसआय पदासाठी शारीरिक चाचणींची गुणमर्यादा 60 वरून 70 गुणांवर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) पोलीस उपनिरीक्षक (PSI) भरतीसंदर्भातही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापूढे पीएसआय पदाची मुलाखत देण्यासाठी शारीरिक चाचणीत 70 गुण आवश्यक आहेत. यापूर्वी ही मर्यादा 60 गुणांची होती. मात्र, आता पीएसआय भरतीमध्ये पुर्व परीक्षा, मुख्य परीक्षेतील गुणांसह, शारीरिक चाचणीत 70 गुण असतील तरच उमेदवार पुढील मुलाखतीस पात्र ठरणार आहे.

MPSC परीक्षांवर कॅमेऱ्यांचा वॉच

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) घेण्यात येणाऱ्या परीक्षेला आता सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील पेपर फुटीची प्रकरणे लक्षात घेता आयोगाने हा निर्णय घेतला आहे. सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांच्या माध्यमातून परीक्षेवर देखरेख ठेवण्यात येणार आहे. परीक्षेदरम्यान तसेच परीक्षेनंतरच्या चित्रीकरणाआधारे कोणत्याही प्रकारे गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारावर तसेच त्याला मदत करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यात उमेदवारी रद्द करण्यासह संबंधित कायद्यातील तरतुदींनुसार फौजदारी कारवाईही (Criminal action) केली जाणार असल्याचे आयोगातर्फे सांगण्यात आले आहे. परीक्षेकरिता नियुक्त कर्मचारी आणि आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन केल्यास त्यावरदेखील कारवाई करण्यात येणार आहे, असे आयोगातर्फे सांगण्यात आले आहे. एमपीएससी परीक्षेत आतापर्यंत झालेल्या गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.