AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aditya Thackeray : गद्दार ज्ञानेश! पुण्यातील आंदोलनात आदित्य ठाकरे बरसले, ‘त्या’ दोघांच्या राजीनाम्यावर महत्त्वाचं विधान

आपण गद्दार ज्ञानेश कुमारांचा राजीनामा घेणारच आणि भिमनवारांचाही राजीनामा घेणार म्हणजे घेणारच, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. ते पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात बोलत होते.

Aditya Thackeray : गद्दार ज्ञानेश! पुण्यातील आंदोलनात आदित्य ठाकरे बरसले, 'त्या' दोघांच्या राजीनाम्यावर महत्त्वाचं विधान
| Updated on: Oct 07, 2026 | 2:09 AM
Share

रोहित पवारांच्या पुण्यातील आंदोलनाचे पडसाद राज्यात उमटत आहेत. आज रात्री पुण्यात अनेक घडामोडी घडल्या आहेत. संजय राऊत, आणि राज ठाकरे यांच्या पुण्यातील आंदोलनस्थळी भेटीनंतर आता पुण्यामध्ये सुरु असलेल्या एमपीएससी विद्यार्थी आंदोलनाला ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनीदेखील भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्र सरकार, निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवरही टीका केली आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं की, ‘केंद्र सरकार कोण चालवत आहे. भिमनवार यांच्या मागे कोण आहे? यावर विद्यार्थ्यांनी त्यांना उत्तर दिलं, ज्यामध्ये सरकारचं नावं त्यांनी घेतलं. त्यानंतर आपण गद्दार ज्ञानेश कुमारांचा राजीनामा घेणारच आणि भिमनवारांचाही राजीनामा घेणार म्हणजे घेणारच, असं आदित्य ठाकरेंनी यावेळी म्हटलं आहे.

ज्ञानेश कुमार आणि विवेक भिमनवारांवर टीकास्र

पुढे बोलताना आदित्य ठाकरेंनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्यावर टीका केली.  त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. त्यांनी म्हटलं की, दिल्लीत निवडणूक आयोगाचे अध्यक्ष ज्ञानेश कुमार आणि राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार बसले आहेत. या दोघांच्या पाठीशी सरकार आहे. या दोघांचेही राजीनामे झाले पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली.

त्या दोघांमुळे देशाचं भवितव्य खराब

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पुढे त्यांनी सांगितलं की, तुमचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात गेला आहे. आपल्या सर्वांची एकच मागणी आहे ती म्हणजे राजीनामा. कोणी राजीनामा दिला पाहिजे, असा प्रश्न विचारुन आदित्य ठाकरे थांबले, तेव्हा सगळ्या विद्यार्थ्यांच्या गर्दीतून विवेक भिमनवार यांच्या नावाचा आवाज आला. तेव्हा आदित्यांनी म्हटलं की, “हे फडणवीस साहेब ऐकून घ्या. यावेळी बोलताना ते म्हणाले की भिमनवार हे फक्त प्यादे आहेत. मुद्दा महत्त्वाचा आहेच, पण देशभरात आणखी एक आंदोलन सुरु आहे, ते म्हणजे ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचं. तुम्हाला कल्पना असेल राहुल गांधी, प्रियाकां गांधी आणि अन्य खासदारांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे हे सरकार आता दडपशाहीची भूमिका राबवत असल्याची टीका आदित्य यांनी त्यांच्या भाषणात केली आहे.

Follow Us
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हास
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हासनगरच्या विकासासाठीही मोठ्या घोषणा
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला...
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग पुरस्कार
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना...
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना राष्ट्रवादीचा इशारा!
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील चारा-पाणीटंचाईचे संकट
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील हजारो जनावरांवर चारा-पाणीटंचाईचे संकट
डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं...
Supriya Sule : डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं उत्तर
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने...
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने भाजप-ठाकरे गट आमनेसामने, नगरसेवकांचा सभात्याग
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन फाईल्स'साठी आंदोलनाचा इशारा!
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल; थेट...
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना विधान भोवलं
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना सुरज चव्हाणांचा थेट इशारा
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला...
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला; संजय राऊतांवरही साधला निशाणा!