राज्यातील 130 रुग्णालयात म्युकरमायकोसिसवर मोफत उपचार, राज्य सरकारकडून स्पष्ट

राज्यातील 130 रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.

राज्यातील 130 रुग्णालयात म्युकरमायकोसिसवर मोफत उपचार, राज्य सरकारकडून स्पष्ट
म्युकरमायकोसिस
Follow us
| Updated on: May 24, 2021 | 4:51 PM

औरंगाबाद : राज्यात कोरोनाचं संकट घोंघावत असतानाच आता म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी (ब्लॅक फंगस) या आजारानेही डोकं वर काढलं आहे. राज्यात म्युकरकायकोसिसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. यात अनेक रुग्ण दगावत आहेत. अशावेळी राज्यातील 130 रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. या रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार केले जाणार आहेत. (Free treatment of mucormycosis patients in 130 hospitals in Maharashtra)

कोरोना साथरोगावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुमोटो याचिका दाखल आहे. त्याबाबत औरंगाबाद खंडपीठाने म्युकरमायकोसिसच्या उपचाराबाबत राज्य सरकारकडे विचारणा केली होती. त्याला उत्तर देताना राज्यातील 130 रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत अशा रुग्णांवर मोफत उपचार केले जात असल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, यापूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्युकरमायकोसिस या आजाराचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश केला असल्याची माहिती दिली होती. तसंच या रुग्णांवरील उपचारासाठी आणि औषधांसाठी लागणारा सर्व खर्च या योजनेतून केला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

‘सर्व रेशनकार्ड धारकांना लाभ मिळेल’

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवरील उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाबाबत घोषणा करतानाच टोपे यांनी अजून एक महत्वाची माहिती दिली आहे. म्युकरमायकोसिस झालेल्या रुग्णाच्या कुटुंबाकडे कुठल्याही रंगाचे अर्थात पिवळे, केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड असेल त्या सर्वांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून मदत दिली जाईल, असंही टोपे यांनी स्पष्ट केलंय.

देशात 18 राज्यांमध्ये 5 हजार 424 रुग्ण

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार 24 मे रोजी सकाळपर्यंत देशातील एकूण 18 राज्यांमध्ये म्युकरमायकोसिसचे (ब्लॅक फंगस) एकूण 5 हजार 424 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये मोठ्या संख्येनं रुग्ण आढळून आल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरातमध्ये 2 हजार 165, महाराष्ट्रात 1 हजार 188, उत्तर प्रदेशात 663, मध्य प्रदेशात 519, हरियाणात 339 आणि आंध्र प्रदेशात 248 म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत. देशात आढळलेल्या म्युकरमायकोसिसच्या 5 हजार 424 रुग्णांपैकी 4 हजार 556 जणांना कोरोनाची लागण झाली होती, तर 55 टक्के रुग्णांना पहिल्यापासूनच मधुमेहाची समस्या होती.

ब्लॅक, व्हाईटनंतर आता यलो फंगसचाही धोका

ब्लॅक फंगसपाठोपाठ व्हाईट फंगसनेही देशात थैमान घातले आहे. त्यानंतर आता येलो फंगसने दस्तक दिली आहे. उत्तर प्रदेशात येलो फंगसचा पहिला रुग्णही सापडला आहे. ब्लॅक फंगस आणि व्हाईट फंगसपेक्षा येलो फंगस अधिक धोकादायक आणि खतरनाक असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं असून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. या येलो फंगसला म्युकोर सेप्टिकस हे नाव देण्यात आलं आहे. येलो फंगस आढळून आलेला रुग्ण गाझियाबादचा राहणारा आहे. 34 वर्षाच्या या तरुणाला आधी कोरोनाची लागण झाली होती. तसेच त्याला मधुमेहाचाही त्रास आहे. ईएनटी सर्जन डॉक्टर बृज पाल त्यागी त्याच्यावर उपचार करत आहेत.

संबंधित बातम्या :

नगर, यवतमाळ, सिंधुदुर्गसह 14 जिल्हे रेड झोनमध्ये, तुमच्या जिल्ह्याची परिस्थिती काय?

लसीकरणासाठी आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पाहून गावकऱ्यांच्या थेट नदीत उड्या! हे कुठे घडलं?

Free treatment of mucormycosis patients in 130 hospitals in Maharashtra

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.