AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mukhyamantri Ladki Bahin yojana : लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, पाच महिन्यात..

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेल्या पाच महिन्यांपासून नवीन अर्जांशिवाय आहे. 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात. योजनेचा दुरुपयोग रोखण्यासाठी अपात्र लाभार्थ्यांची वगळणी करण्यात आली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर योजना स्थगित असून मानधन वाढीचे आश्वासन देण्यात आले आहे. योजनेची लोकप्रियता कमी झाली आहे का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Mukhyamantri Ladki Bahin yojana : लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, पाच महिन्यात..
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाImage Credit source: social media
| Updated on: Aug 14, 2025 | 10:49 AM
Share

Ladki Bahin Yojana : घोषणा झाल्यापासून काही ना काही कारणामुळे सतत चर्चेत असलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही वर्षभरानंतरही पुन्हा चर्चेचा विषय ठरली आहे. 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांसाठी दरमहा 1500 रुपये देण्याची टघोषणा गेल्या वर्षी जुलै महिन्यात उपमुख्यमंत्री यअजित पवार यांनी केली आणि एकच गदारोळ झाला. महायुतीसाठी ही योजना चांगली लाभकारक ठरली असली तरी विरोधकांनी त्यावरून आक्रमक भूमिका घेत योजनेला विरोधही दर्शवला होता. मात्र तरीही राज्यातील कोट्यावधी महिलांनी या योजनेसाठी अरज केला, त्यापैकी 2 कोटींपेक्षा अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आणि दरमहा 1500 रुपये त्यांच्या खात्यात जमा होत आहेत.

मात्र या योजनेबद्दल आता एक नवी , मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण लाडकी बहीण योजनेकडे महिलांनी पाठ फिरवली की काय ? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. कारण गेल्या 5 महिन्यांत या योजनेसाठी एकही नवा अर्ज आलेला नाही. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.

लाडकी बहीण योजनेची क्रेझ ओसरली ?

महायुतीच्या महत्वाकांक्षी योजनेपैकी एक असलेल्या आणि विधानसभा निवडणुकीत त्यांना घवघवीत यश मिळवून देण्यास कारणीभूत ठरलेल्या लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वर्षभरापासून कोट्यावधी महिलांना या योजनेचा लाभ घेतल्याने दरमहा 1500 रुपये त्यांच्या खात्यातही जमा झाले,.

महायुतीसाठी गेमचेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. मागील लोकसभा निवडणुकांचे निकाल आल्यानंतर महायुती सरकारने माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि प्रभावी अंमलबजावणीकडेही लक्ष दिले. याचाच परिणाम विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाला. न भूतो असा विजय महायुतीचा झाला. परंतु, यानंतर या योजनेची छाननी करून लाखो अपात्र लाभार्थी महिलांना वगळण्यात आले.

मात्र, आता याच लाडकी बहीण योजनेची क्रेझ ओसरली का, अशी चर्चा सुरू झाली आहे. याचे कारण म्हणजे गेल्या पाच महिन्यात लाडकी बहीण योजनेसाठी एकही नवा अर्ज केला नसल्याचा दावा केला जात आहे. यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींनी या योजनेकडे पाठ फिरवली का, अशी कुजबुज सुरू झाली आहे.

योग्यवेळी वाढणार मानधन

आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना पडताळणी स्थगित केल्याचे सांगितले जात असून, योग्यवेळी या योजनेचे पैसे वाढवण्याची ग्वाही देण्यात आली आहे. लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्षे सुरू राहील आणि सध्या मिळणारे महिन्याचे 1500 रुपये मानधन योग्यवेळी वाढविले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

योजनेचा घेतला गैरफायदा

मात्र याच योजनेचा अनेकांनी गैरफायदा घेतल्याचेही वेळोवेळी समोर आले. काही जणांनी योजनेचा दुरुपयोग करून घुसखोरी केली, त्यांचं मानधन थांबवण्यात येणार आहे. तर महिलांसाठीच ही योजना असतानही, काही ‘हुशार’ भावांनी ओळख पटून नये म्हणून हुशारी करत आपला फोटो लावण्याऐवजी मोटारसायकलचा फोटो लावला आणि योजनेसाठी लाभार्थी ठरत ते पैसे घेतले. मात्र आता अशा घुसखोरांचे अनुदान थांबवण्यात आले आहे. प्रत्येकाची पडताळणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच पात्र असूनही अन्याय झालेल्या भगिनींवरील अन्याय दूर केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Follow Us
पूर्णेकर समर्थकांना मारहाण; ठाणे पोलीस पालकमंत्र्यांची धुणीभांडी करतात
Sanjay Raut : पूर्णेकर समर्थकांना मारहाण; ठाणे पोलीस पालकमंत्र्यांची धुणीभांडी करतात का? संजय राऊतांचा थेट सवाल
एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;
Gunratna Sadavarte : एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;  गुणरत्न सदावर्तेंचं गाण्यातून भाकीत
माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर
Ravindra Dhangekar : माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर यांनी नेमकं कोणाला सुनावलं?
ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर..
Kumbh Mela Update : ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर आज भाविकांसाठी राहणार बंद
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! राष्ट्रपतींच्या हस्ते
Nashik Kumbh : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद, राष्ट्रपतींच्या हस्ते प्रथमच ध्वजारोहण; एका ऐतिहासिक पर्वाला सुरुवात
ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
Devendra Fadnavis : ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; शेलारांच्या विधानाने चर्चांना उधाण
Ashish Shelar : मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; आशिष शेलारांच्या एका विधानाने राजकीय चर्चांना उधाण
दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका
Gunratna Sadavarte : दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका; पूर्णेकर प्रकरणावरून आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरूच
सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार, राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे....
Minakshi Shinde : सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार..., राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे पहिल्यांदाच बोलल्या; आरोपांवर काय म्हणाल्या?
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?