
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान पार पडले. त्यानंतर आज या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. राज्यात सत्तेत असलेले पक्ष काही महापालिकांमध्ये एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. जवळपास सर्वच महापालिकांवर गेल्या काही दिवसांपासून प्रशासकीय राज बघायला मिळाले. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नाशिक, नागपूर, जळगाव या महापालिकांच्या निवडणुकीकडे राज्याच्या नजरा आहेत. या प्रत्येक महापालिकेचा निकाल तुम्हाला टीव्ही 9 मराठीवर पहायला मिळणार आहे.
महत्त्वाच्या लिंक्स
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE
मुंबई महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE
मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर एक्झिट पोलही समोर आले आहेत. मुंबई महापालिकेत महायुतीला बहुमत मिळताना दिसत आहे. भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 140 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना, मनसे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला एकूण 62-65 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युतीला एकूण 20 जागा मिळण्याची शक्यता आहे.
PRAB च्या एक्झिट पोलनुसार पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला बहुमत मिळताना दिसत आहे. येथे भाजपला 64 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर अजित दादांच्या राष्ट्रवादीला 51, शिवसेनेला 9, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 2, काँग्रेसला 1 आणि मनसेला एक जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या महानगर पालिकेत पुन्हा एकदा भाजप सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीचाही एक्झिट पोल समोर आला आहे. जनमतच्या एक्झिट पोलनुसार पुण्यामध्ये पुन्हा एकदा भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे, पुण्यात भाजपला 93 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर शिवसेनेला 6 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेना ठाकरे गटाला एकूण सात जागा मिळण्याची शक्यता आहे. यामुळे पुण्यात राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांना मोठा धक्का बसला आहे. पुण्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला 43 तरे राष्ट्रवादी शरद पवार गटाला 8 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या एक्झिट पोलनुसार मनसेला तर पुण्यात खातं देखील उघडता आलेलं नाहीये, तर अपक्ष दोन ते तीन ठिकाणी विजयी होण्याचा अंदाज आहे.