Dhananjay Munde | ताई, कधीतरी लेन्सचा फोकस बदलावा लागतो… पंकजा मुंडेंच्या कोपरखळ्यांवर धनंजय मुंडेंचं उत्तर!

कार्यक्रमात मंचावरील उपस्थित सर्वच नेत्यांसाठी त्यांनी लेन्स या शब्दाचा अत्यंत चपखलपणे वापर केला. याला उत्तर देताना धनंजय मुंडे यांनीही लेन्सवर भर दिला. ते म्हणाले, ताई, कधीतरी आपल्या लेन्सचा फोकस बदलावा लागतो, असा टोला मारला.

Dhananjay Munde | ताई, कधीतरी लेन्सचा फोकस बदलावा लागतो... पंकजा मुंडेंच्या कोपरखळ्यांवर धनंजय मुंडेंचं उत्तर!
Image Credit source: tv9 marathi
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

May 18, 2022 | 5:21 PM

मुंबईः मुंबईतल्या डॉ. तात्याराव लहाने (Dr. Tatyarao Lahane) यांच्या नव्या नेत्र रुग्णालयाचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. मात्र हा सोहळा भावा-बहिणींच्या टिका-टिप्पण्यांमुळे चांगलाच गाजतोय. कार्यक्रमात बीडचे कट्टर राजकीय शत्रू पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) उपस्थित होते. कार्यक्रमात सुरुवातीला पंकजा मुंडे यांना भाषणाची संधी मिळाली तेव्हा त्यांनी नेत्रालयाच्या उद्घाटनाचे औचित्य साधून चांगलीच बॅटिंग केली. यावेळी धनंजय मुंडेंना उद्देशून, मुंडे आणि महाजनांच्या लेन्समधून पहात मोठे झालेले आणि आता शरद पवारांची लेन्स वापरणारे धनंजय मुंडे असा उल्लेख त्यांनी केला. कार्यक्रमात मंचावरील उपस्थित सर्वच नेत्यांसाठी त्यांनी लेन्स या शब्दाचा अत्यंत चपखलपणे वापर केला. याला उत्तर देताना धनंजय मुंडे यांनीही लेन्सवर भर दिला. ते म्हणाले, ताई, कधीतरी आपल्या लेन्सचा फोकस बदलावा लागतो, असा टोला मारला.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

मुंबईतील नेत्र रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना पंकजा मुंडेनी व्यासपीठावरील मान्यवरांचा उल्लेख करताना प्रत्येकाच्या आधी लेन्स शब्दाचा वापर केला. त्या म्हणाल्या, ज्या व्यक्तीच्या अनुभवाच्या, राजकीय दृष्टीच्या लेन्स चांगल्या आहेत. असे शरद पवार, ज्यांच्या लेन्स सर्वांनाच सूट होतात, असे बाळासाहेब थोरात, ज्यांच्या लेन्सकडे युवकांच्या नजरा आहेत, असे आदित्य ठाकरे, मैत्रीची परंरा असलेले अमित देशमुख, मुंडे महाजनांच्या लेन्समधून पहात मोठे झालेले व पवार साहेबांच्या लेन्समधून बघणारे धनंजय मुंडे, माझ्या लेन्समधून बघत काम करणाऱ्या आमि खूप मेरीट असलेल्या भगिनी खा. प्रीतम मुंडे यांना मी अभिवादन करते…

बहिणीला भावाचं प्रत्युत्तर काय?

पंकजा मुंडे यांनी अशा प्रकारे शाब्दिक कोट्या केल्यानंतर उपस्थितांचं चांगलंच मनोरंजन झालं. यानंतर भाषण करताना धनंजय मुंडे म्हणाले, ‘ कधीतरी ताई आपल्याला लेन्सचा फोकस बदलावा लागतो.. मी आणि आदित्य बोलत असताना आदित्य म्हणाले ताईंनी लेन्स बदलून महाविकास आघाडीच्या लावल्या तर बरं होईल, मला कधीही व्यवहार कळाला नाही हे माझ्यापेक्षा जास्त माझ्या बहिणीला कळलं आहे, असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें