AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सिंगल मदर’च्या मुलीला आईचं आडनाव, जात लावण्याचा..; हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

एकल मातेच्या पाल्याला आईचं नाव, आडनाव आणि जात लावण्याच्या अधिकाराबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. याविषयी याचिकाकर्तीचे वकील काय म्हणाले, ते सविस्तर वाचा..

'सिंगल मदर'च्या मुलीला आईचं आडनाव, जात लावण्याचा..; हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
Mumbai High CourtImage Credit source: Tv9
| Updated on: Feb 20, 2026 | 12:08 PM
Share

आईसोबत वाढणाऱ्या मुलीला आईचं नाव आणि जात लावण्याचा संविधानिक हक्क असल्याचा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी अर्ज फेटाळल्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचलं होतं. तेव्हा आईचे सर्व कागजपत्र घेऊन नोंदी बदलण्याचा आदेश कोर्टाने दिले आहेत. त्याचप्रमाणे पाल्याच्या सार्वजनिक ओळखीसाठी एकट्या आईला पूर्ण पालक म्हणून मान्यता देणं हे दानधर्माचं काम नाही, संवैधानिक निष्ठा आहे, असंही निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आहे. फिर्यादींकडून बाजू मांडणारे वकील संघमित्रा वडमारे यांनी ही माहिती दिली.

नेमकं काय आहे प्रकरण?

या प्रकरणाविषयी वडमारे यांनी सांगितलं, “माझ्याकडे एकल माता आली आणि तिने शिक्षण अधिकाऱ्यांनी तिचा अर्ज फेटाळल्याचं सांगितलं. आपल्या मुलीला आपलं नाव आणि जात द्यायची त्यांची मागणी होती. मात्र शिक्षण अधिकाऱ्यांनी ते नाकारलं होतं. सेकंडरी स्कूल कोर्टप्रमाणे मुलीला किंवा मुलाला आईचं नाव आणि जात लावता येणार नाही. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचे दाखले देत सांगितलं की जर मुलीचं संगोपन पूर्णपणे आई करत असेल तर तिने आईचं नाव लावणं हा तिचा संविधानिक हक्क आहे. त्यामुळे आईचे सगळे कागदपत्र घेऊन मुलीचं आडनाव आणि जात बदलण्यात यावी, असं उच्च न्यायालयाने शिक्षणाधिकारी आणि जात पडताळणी विभागाला सांगितलं आहे.”

आई-वडिलांमध्ये झालेल्या तडजोडीनुसार, मुलगी कायमस्वरुपी आईच्या ताब्यात राहील आणि वडिलांची पालक म्हणून कोणतीही भूमिका राहणार नाही, असं ठरवण्यात आलं होतं. त्यामुळे याचिकाकर्ती आईने मुलीच्या शालेय नोंदींमध्ये नाव आणि जात बदलण्याची मागणी केली होती. मात्र कायद्याप्रमाणे काही त्रुटी असतील तर नाव बदलता येईल, मात्र मुलीच्या वडिलांचं नाव, आडनाव, जात आईच्या नाव, आडनाव आणि जातीप्रमाणे बदलता येणार नाही, असं शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलं. यात आई ही अनुसूचित जातीची आहे, तर वडील ओपन प्रवर्गातील आहेत. न्यायालयाने याचिका कर्तीची मागणी योग्य ठरवली. मुलाची किंवा मुलीची सार्वजनिक ओळख ही केवळ वडिलांच्या नावापुरती मर्यादित असू शकत नाही, असं उच्च न्यायालयाने नमूद केलंय.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...