Dhananjay Munde : ह्याची आमदारकी पण रद्द होते, करुणा शर्माच्या बॉलींगवर निलेश राणेंचा सिक्सर

धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुले लपवली आहेत. त्यांनी स्वतःच्या अनेक बायका लपरवल्या आहेत. त्यामुळे त्यांना आता अर्ज भरण्यासाठी तांत्रिक अडचणी येणार आहेत. माझ्याकडे कायदेशीर पुरावे आहेत. असा इशारा करुणा शर्मा यांनी आज कोल्हापूरमध्ये दिला.

Dhananjay Munde : ह्याची आमदारकी पण रद्द होते, करुणा शर्माच्या बॉलींगवर निलेश राणेंचा सिक्सर
निलेश राणे, धनंजय मुंडे
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 3:12 PM

मुंबईः धनंजय मुंडे (Dhanajay Munde) आणि स्वतःची सहा मुलं लपवली, अनेक बायकाही लपवल्या असा खळबळजनक आरोप करुणा शर्मा यांनी केलाय. त्यानंतर भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी तर धनंजय मुंडेंच्या आमदारकीवरच आक्षेप घेतला आहे. धनंजय मुंडे यांना स्वतःची IPLटीम बनवायची आहे वाटतं… हिंदूंचे कायदे धनंजय मुंडेला लागू होत नाहीत का, याची आमदारकी पण रद्द होऊ शकते, असं ट्वीट निलेश राणे यांनी केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील चर्चांना पुन्हा एकदा हवा मिळाली आहे. कोल्हापूरमध्ये आज सकाळीच करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात वक्तव्य केलं. करुणा शर्मा (Karuna Sharma) आणि धनंजय मुंडे यांची प्रेमकहाणी लवकरच मराठीत येणार आहे, असा दावा त्यांनी केला. शिवशक्तीसेना या पक्षाची स्थापनाही त्यांनी केली आहे.

निलेश राणेंचं ट्वीट काय?

करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांनी केलेल्या आरोपानंतर निलेश राणे यांनी ट्वीट केले. त्यात ते म्हणाले, धनंजय मुंडे यांना हिंदूंचे कायदे लागू होत नाहीत का? ह्याची आमदारकपण रद्द होते. कारण याने निवडणूक आयोगाला खोटी माहिती दिली. त्यांनी स्वतः मान्य केले आहे. याला जंगलात पाठवा. पिसाळलाय… ‘

करुणा शर्मांचे काय आरोप?

करुणा शर्मा यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा केली असून त्यांनी आज कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेतले. निवडणुकीत आपलाच विजय होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. तसेच करुणा आणि धनंजय यांची प्रेमकहाणी मराठीत येणार असून त्यावर काम सुरु आहे. धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुले लपवली आहेत. त्यांनी स्वतःच्या अनेक बायका लपरवल्या आहेत. त्यामुळे त्यांना आता अर्ज भरण्यासाठी तांत्रिक अडचणी येणार आहेत. माझ्याकडे कायदेशीर पुरावे आहेत. असा सूचक इशारा त्यांनी यावेळी दिला. करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचे परस्पर सहमतीने संबंध होते, असे धनंजय मुंडे यांनी मान्य केले होते. तसेच त्यांच्या दोन्ही मुलांनाही आपले नाव देणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मात्र करुणा शर्मांशी विवाहाबाबतची माहिती दिलेली नाही. त्यानंतर करुणा शर्मा यांनी आता धनंजय मुंडे यांच्याविरोधात राजकारणात उतरायचं ठरवलं असून कोल्हापूरमधून त्या पहिली निवडणूक लढवणार आहेत

धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया काय?

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मांच्या या आरोपांनाही प्रत्युत्तर दिले आहे. करुणा शर्मा यांनी याआधीदेखील पत्रकारांशी बोलताना धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यावर लवकरच चित्रपट येणार आहे, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आज कोल्हापुरात त्यांनी धनंजय मुंडेंनी मुले आणि बायका लपवल्या असल्याचं विधान केलं. यावर प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे म्हणाले, करुणा शर्मा यांना पिक्चर काढायचा असेल तर त्यांनी प्रोड्यूसरकडे जावं, असं माध्यमांकडे जाऊन काहीही उपयोग होणार नाही.

इतर बातम्या-

Video: सत्ता आहे म्हणून कायदा हातात घेणार? सोशल मीडियावर लिहिलं म्हणून शिवसैनिकांची एकाला मारहाण

मद्यधुंद तरुणींचा धिंगाणा, टल्ली झालेल्या पोरींचा व्हिडीओ व्हायरल

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.